पुणे - तलवारीने केक कापणाऱ्या बारा जणांवर गुन्हा 

संदीप घिसे 
बुधवार, 7 मार्च 2018

पिंपरी (पुणे) : तलवारीने केक कापून मित्राचा वाढदिवस साजरा करणाऱ्या बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना निगडी येथे मंगळवारी (ता. ६) सायंकाळी घडली.

शुभम अमर मारिया (वय १८, रा. खराळवाडी पिंपरी), सागर शिवा शिंदे (वय १८), साहिल रमजान शेख (वय १८ दोघेही रा. ओटा स्कीम, निगडी), संदीप मारुती लोहेकर (वय २० रा. पिंपरी), रामचंद्र सुनील नाफडे (वय १९ रा. निगडी), सुमित शिवाजी कांबळे (वय १९, रा. ओटास्कीम निगडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याशिवाय सहा अल्पवयीन मुलांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास संत कबीर गार्डन, प्राधिकरण, निगडी येथे काही जण तलवारीने केक कापत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार घटना स्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तलवारीच्या आकाराएवढे दोन लोखंडी कोयते चार वाहने असा दोन लाख चाळीस हजार चारशे रुपयांचा ऐवज हस्तगत केला.

निगडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयकुमार पळसुले, पोलिस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक देवेंद्र चव्हाण, सहाय्यक उपनिरीक्षक तात्या तापकीर, पोलिस हवालदार नारायण जाधव, फारुख मुल्ला, संदीप पाटील, सोमनाथ जाधव, आनंद चव्हाण यांच्या पथकाने ही कामगिरी केली याबाबत अधिक तपास सहाय्यक उपनिरीक्षक तात्या तापकीर करीत आहेत.

Web Title: Marathi news pune news cake cutting by sword crime

टॅग्स