शिवनेरीच्या शिवसृष्टीमध्ये राजमाता जिजाऊंना जयंतीनिमित्त अभिवादन 

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

जुन्नर : सकल मराठा समाज जुन्नर शिवनेरीच्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले. किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या शिवसृष्टी मधील राजमाता जिजाऊ व बालशिवाजी यांच्या भव्य शिल्पास सकल मराठा समाज जुन्नर शिवनेरीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जुन्नर शहर, कबाडवाडी, पिंपळगाव सिद्धनाथ, खामगाव, वडज, माणिकडोह, काले आदी भागातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय, जय भवानी जय शिवाजी आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.

जुन्नर : सकल मराठा समाज जुन्नर शिवनेरीच्या वतीने राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्ताने अभिवादन करण्यात आले. किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या शिवसृष्टी मधील राजमाता जिजाऊ व बालशिवाजी यांच्या भव्य शिल्पास सकल मराठा समाज जुन्नर शिवनेरीच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जुन्नर शहर, कबाडवाडी, पिंपळगाव सिद्धनाथ, खामगाव, वडज, माणिकडोह, काले आदी भागातील तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते. तुमचं आमचं नात काय जय जिजाऊ जय शिवराय, जय भवानी जय शिवाजी आदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. यावेळी सकल मराठा समाज जुन्नर शिवनेरीचे संदेश बारवे, मिननाथ पानसरे, विवेक पापडे, नितीन कबाडी, निखिल शेजवळ, संचित गुंजाळ, चैतन्य कबाडी, श्रीराम बेनके, संदीप कबाडी, अक्षय कबाडी, गणेश कंठाळे, कल्पेश गायकवाड, सागर बुट्टे, रुपेश कबाडी, किरण पापडे, शुभम पापडे, रोहन पापडे, संदेश भागवत, भावेश डुंबरे यांसह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Web Title: Marathi news pune news celebrating rajmata jijaau birth anniversary at shivneri

टॅग्स