आम्ही रस्त्यावरील निधी 15 पटीने वाढविला: चंद्रकांत पाटील

राजेंद्रकृष्ण कापसे
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

असा होणार पूल
पाण्याचा कालवा व बंद जलवाहिनी असे दोन कालवे आहेत. दोन्ही कालव्यावर मिळून जाण्यासाठी दोन- दोन असे चार पूल आहेत. असे सांगून आमदार तापकीर यांनी सांगितले की, "एका पुलाची रुंदी ही 10 मीटर असणार आहे. म्हणजे एकापुलावर एका वेळी दोन मोठी वाहने जातील (दोन लेनच्या) अशा प्रकारे चार पूल असतील. पाणी वाहून नेणारा कालव्याची रुंदी जास्त आहे. त्यामुळे पुलाची रुंदी तेथे 19 मीटर असणार आहे. बंद जलवाहिनच्या कालव्यावरील पुलाची लांबी साडेसोळा मीटर असणार आहे. पुलाच्या निधीसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री गिरीश बापट यांनी मदत केली. असे ही तापकीर यांनी सांगितले.

पुणे : "सुसज्ज रस्त्यामुळे शेती, शिक्षण व औदयोगिक क्षेत्राची प्रगती होते. म्हणून आमच्या सरकारने राज्यातीलK 1500 ते 1800 कोटीचे रस्त्याचे बजेट 15 पटीने वाढविले आहे. विविध योजनेतून 38हजार किलोमीटरचे रस्ते पूर्ण करणार आहोत." अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

पुणे खडकवासला रस्त्यावरील नांदेड येथील दोन कालव्यावर चार पूलाचे भूमिपूजन पाटील यांच्या हस्ते आमदार भीमराव तापकीर यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मंगळवारी झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने पाच कोटी रुपये खर्चून पूल बांधण्यात येत आहे. यासाठी आमदार तापकीर यांनी मागील वर्षी पासून पाठपुरावा केला होता.

केंद्र सरकार पूर्वी पाच हजार किलोमीटर रस्ते होत होते. आम्ही ते केंद्र सरकारच्या माध्यमातून 22 हजार किलोमीटर रस्ते तीन वर्षात करीत आहोत. असे सांगून पाटील म्हणाले "राज्यातील दोन मार्गिका(लेनचे) असलेले रस्ते जागा संपादित न करता. साईड पट्टी वापरात आणून 10हजार किलोमीटरचे रस्ते होत आहे. तर केंद्र सरकारच्या भारत माला या योजनेतून सुमारे सहा हजार किलोमीटरचे रस्ते करीत आहोत. अशा प्रकारे 38 हजार किलोमीटरची कामे सुरू आहेत."

दरवर्षी पावसाळ्यानंतर नोव्हेंबर- डिसेंबर मध्ये खड्डे पडत होते. म्हणून यंदा आवाहन स्वीकारून आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हद्दीतील 89 हजार किलोमीटरचे रस्त्यावरील खड्डे बुजविले. यामध्ये ग्रामीण रस्त्याचा समवेश नव्हता. असे ही पाटील यांनी सांगितले.

आमदार तापकीर म्हणाले, "पूर्वी मतदार संघात रस्त्याचीच कामे ही लाखात असायची भाजप सेनेचे सरकार आल्यानंतर रस्त्याच्या कामाची आकडेवारी ही कोट्यवधीत होत आहेत. आंबी, कोंढणपूर ते कल्याण, गाऊडदरा, आर्वी, खरमरी ते दुरुकदरा यांना कोट्यवधींचा निधी रस्त्यासाठी मिळाला आहे. मला देखील सरकार मधील माझ्या मंत्र्यांचा अभिमान वाटत आहे. 

असा होणार पूल
पाण्याचा कालवा व बंद जलवाहिनी असे दोन कालवे आहेत. दोन्ही कालव्यावर मिळून जाण्यासाठी दोन- दोन असे चार पूल आहेत. असे सांगून आमदार तापकीर यांनी सांगितले की, "एका पुलाची रुंदी ही 10 मीटर असणार आहे. म्हणजे एकापुलावर एका वेळी दोन मोठी वाहने जातील (दोन लेनच्या) अशा प्रकारे चार पूल असतील. पाणी वाहून नेणारा कालव्याची रुंदी जास्त आहे. त्यामुळे पुलाची रुंदी तेथे 19 मीटर असणार आहे. बंद जलवाहिनच्या कालव्यावरील पुलाची लांबी साडेसोळा मीटर असणार आहे. पुलाच्या निधीसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री गिरीश बापट यांनी मदत केली. असे ही तापकीर यांनी सांगितले.

Web Title: Marathi news Pune news Chandrakant Patil statement on roads