कठोर परिश्रम आणि ध्येयवादी जिद्द ही यशस्वी माणसांची लक्षणे: आयुष प्रसाद

कृष्णकांत कोबल
सोमवार, 5 मार्च 2018

घोडेगाव (ता. आंबेगाव)  येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्याल्याच्या वतीने शहर परिसरातील सात आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी मांजरीफार्म येथे स्पर्धा परिक्षा कार्यशाळा आयोजित केली होती. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना आयुष प्रसाद बोलत होते. 

मांजरी : कठोर परिश्रम आणि ध्येयवादी जिद्द ही यशस्वी माणसांची लक्षणे आहेत. या लक्षणांसह भाषा प्रभुत्व, भरपूर वाचन व आत्मविश्वास बाळगल्यास यशाची शिखरे खुजी झाल्याशिवाय राहणार नाहीत, असे मत आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केले.

घोडेगाव (ता. आंबेगाव)  येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्याल्याच्या वतीने शहर परिसरातील सात आदिवासी वस्तीगृहातील विद्यार्थ्यांसाठी मांजरीफार्म येथे स्पर्धा परिक्षा कार्यशाळा आयोजित केली होती. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना आयुष प्रसाद बोलत होते. 

उद्योजक अविनाश जगताप, देवानंद लोंढे, स्नेहल लोंढे, दिपक कालेकर आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी प्रकल्पस्तरीय क्रिडा स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. तसेच "माझा आदिवासी, आमचा विकास'' या निबंध पुस्तिकेचे प्रकाशनही उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.

प्रकल्प अधिकारी प्रसाद म्हणाले, "आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सवलती आणि  योजनांचा त्यांनी योग्य लाभ घेतल्यास प्रत्येक विद्यार्थी निश्चितच विकास साधू शकेल. स्पर्धा परीक्षांबरोबरच उद्योग व्यवसायातही तो मोठी झेप घेऊ शकतो. 
नुकत्याच मुंबई येथे झालेल्या  मँग्नेटीक महाराष्ट्र परिषदेत प्रकल्प कार्यालयाच्या कक्षामध्ये ५२ सामंजस्य करार झालेले आहेत. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होणार आहे,  असेही प्रसाद यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाचे सुञसंचलन सतिष वाघमारे यांनी केले, तर आभार वृषाली घैसास यांनी मानले.

Web Title: Marathi news Pune news competitive exam