सर्वांगिण विकासासाठी जास्तीजास्त निधीची तरतूद करणार: भरणे 

राजकुमार थोरात
रविवार, 4 मार्च 2018

दळणवळण सुविधा चांगली असल्यास विकासाची गती वाढण्यास मोलाची मदत होते.तालुक्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी तालुक्यातील रस्त्याची  कामे मार्गी लावण्यास प्राधान्य दिले जात आहे.

वालचंदनगर : अागामी बटेजमध्ये इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी रस्त्याच्या कामासाठी जास्तीजास्त निधीची तरतुद करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती आमदार दत्तात्रेय भरणे यांनी दिली.

वालचंदनगर (ता.इंदापूर)येथे वालचंदनगर ते सांधा चाळ रस्त्याच्या भूमिपूजनाच्या प्रसंगी आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.यावेळी जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने, जिल्हा परिषद सदस्या वैशाली पाटील,माजी सदस्य प्रतापराव पाटील,पंचायत समिती सदस्या डॉ.शैला फडतरे,सारिका लोंढे,कळंबच्या सरपंच उज्वला फडतरे,राष्ट्रवादी युवकचे वालचंदनगर शहरचे अध्यक्ष तुषार घाडगे, एम.बी.मिसाळ, सुहास डोंबाळे, रामचंद्र कदम, मधूकर पाटील, शुभम निंबाळकर, राजेश जामदार,सागर मिसाळ,अंबादास लांडगे, पोपट मिसाळ, अतुल तेरखेडकर, बाळासाहेब दंगाणे, पिन्टू डोंबाळे, अंबादास शेळके,सुहास हिप्परकर, कालिदास राऊत,गणेश धांडोरे , विजय कांबळे, सुषमा वाघमारे, लता उबाळे,वैशाली मिसाळ उपस्थित होते.

यावेळी आमदार भरणे यांनी सांगितले की, दळणवळण सुविधा चांगली असल्यास विकासाची गती वाढण्यास मोलाची मदत होते.तालुक्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी तालुक्यातील रस्त्याची  कामे मार्गी लावण्यास प्राधान्य दिले जात आहे. नव्याने सुरु होणाऱ्या आर्थिक वर्षामध्ये तालुक्यामध्ये रस्त्यासाठी जास्तीजास्त विकासनिधी तरतुद केली जाईल.माजी उपमुख्यमंत्री अजित पवार,विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे व पालकमंत्रयाच्या फंडातुनही निधी उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.यावेळी भरणे व माने यांच्या हस्ते ३० लाख रुपये खर्चुन होणाऱ्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

Web Title: Marathi news Pune news Dattatraya bharne statement