मातृभाषेचा सार्थ अभिमान असलाच पाहिजे : प्रा. रेव्हरंड डेनिस जोसेफ 

प्रफुल्ल भंडारी 
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

दौंड (पुणे) : मातृभाषेचा सार्थ अभिमान असलाच पाहिजे, असे प्रतिपादन दौंड शहरातील सेंट सेबॅस्टिन विद्यालयाचे प्राचार्य रेव्हरंड डेनिस जोसेफ यांनी केले आहे. 

दौंड (पुणे) : मातृभाषेचा सार्थ अभिमान असलाच पाहिजे, असे प्रतिपादन दौंड शहरातील सेंट सेबॅस्टिन विद्यालयाचे प्राचार्य रेव्हरंड डेनिस जोसेफ यांनी केले आहे. 

कवीवर्य विष्णु वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या मराठी भाषा दिनानिमित्त दौंड शहरातील सेंट सेबॅस्टिन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात आज (ता. 27) आयोजित विशेष सभेत प्राचार्य डेनिस जोसेफ यांनी हे प्रतिपादन केले. विद्यालयात दररोज इंग्रजीत होणारा परिपाठ आज मराठीतून घेण्यात आला. पर्यवेक्षक नितीन शिरसाठ व पर्यवेक्षिका ज्यूडी विलियम्स या वेळी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी काव्य वाचन, अभंग गायन करण्यासह बडबडगीतांचे सादरीकरण केले. 

डेनिस जोसेफ म्हणाले, महाराष्ट्राने देशाला अनेक विचारवंत, राष्ट्रभक्त, लेखक, सामाजिक कार्यकर्ते देण्यासह देशाच्या विकासात योगदान दिलेले आहे. राज्य अशाच प्रकारे प्रगतीपथावर राहो आणि राज्यातील प्रत्येकाची उत्तरोत्तर प्रगती व्हावी. करा कष्ट नाही तर व्हाल नष्ट, या म्हणीची आठवण ठेवत विद्यार्थ्यांसह सर्वांनीच कष्टाला पर्याय नाही हे सदैव लक्षात ठेवावे. 

उत्कर्ष कुलकर्णी या विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील पोवाडा सादर केला तर अत्रेयी बोरूडे हिने मराठीची महती सांगणारे मनोगत व्यक्त केले. विद्यार्थिनींनी नऊवारी व सहावारी साड्या तर विद्यार्थ्यांनी धोतर, फेटा, खादीचा कोट, पगडी, नेहरू सदरा, आदी प्रकारचा मराठमोळा पेहराव परिधान केला होता.

शिक्षक विजय ओहोळ, लक्ष्मण घोडके, महेश गटणे, रईसा शेख, शरद वाळके, ललित सोनवणे, मीनल वेगस, झेड. शेख, स्वाती जेम्स, आदींनी कार्यक्रमांचे संयोजन केले होते. महेश गटणे यांनी आभारप्रदर्शन केले. 

Web Title: Marathi news pune news daund proud of mother tongue