भुजबळ लढवय्ये नेते, त्यांना जामीन मिळेल: मंत्री दिलीप कांबळे

Dilip Kamble
Dilip Kamble

पुणे : "ज्या कलमाच्या आधारे छगन भुजबळ यांना कायद्याच्या कचाटयात अडकविण्यात आले आहे. ते "कलम 24" रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे भुजबळ यांना जामीन मिळण्यातील अडचण दूर झाली आहे" अशी माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी सोमवारी व्यक्त केले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले पुण्यतिथीनिमित्त समता भुमी येथे "महात्मा फुले समता पुरस्कार वितरण" कार्यक्रमाचे आयोजन केले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. मा. गो. माली यांना "महात्मा फुले समता पुरस्कार" करण्यात आला. यावेळी 
केंद्रीय मनुष्यबळ राज्यमंत्री उपेन्द्र कुशवाहा, परिषदेचे अध्यक्ष कृष्णकांत कुदले, खासदार पंकज भुजबळ, राजस्थान येथील मोतीलाल सांकला आदी उपस्थित होते. कांबळे यांच्याकडुन भुजबळ यांचे कौतुक करण्यात आले. भुजबळ लढवय्ये नेते असून, समाजासाठी ते बाहेर असणे गरजेचे आहे. त्यांना जामीन मिळेल, अशी अपेक्षाही कांबळे यांनी व्यक्त केली

सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे म्हणाले, "भुजबळ हे सामान्य नागरिक, गरीब व दुर्लक्षितासाठी झटणारे नेते आहेत. मात्र काही वर्षांपासून ते कायद्याच्या कचाटयात अडकले आहेत. कलम 24 मुळे त्यांना जामिन मिळत नव्हता. मात्र आता हे कलम रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे आता भुजबळ यांचा जामिन मिळण्याचा अडसर दूर झाला आहे."

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com