पोलिसांच्या उलट तपासणीमुळे महिला तक्रार न देताच परत

पराग जगताप
सोमवार, 15 जानेवारी 2018

ओतूर (जुन्नर) : ओतूर ता. जुन्नर येथील आठवडे बाजारात जयश्री सचिन चेकर (रा. मुक्ताई नगर कोळमाथा, ओतूर) यांची पर्स चोरीला गेली.
 पर्समध्ये रोख सोळा हजार रुपये व महत्वाची कागदपत्रे होती. तक्रार देण्यासाठी गेलेल्या चेकर यांची पोलीसांनी उलटतपासणी सुरु केल्याने नको त्या कटकटी म्हणून त्या तक्रार न देताच परत गेल्या. 

याबाबत चेकर यांनी दिलेली माहिती अशी की, ओतूर येथील बाजारात पर्स चोरीला गेल्यानंतर त्या ओतूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्या होत्या. त्यांनी पोलीसांना सर्व हकीगत सांगितली. त्या ठिकाणी त्यांना तक्रार कुणाविरुध्द करायची, साक्षीदार कोण तसेच जुन्नरला हेलपाटे मारावे लागतील. त्यापेक्षा 
कागदपत्रे मिळविण्यासाठी प्रतिज्ञापत्र बनवून आणा, त्यावर सही शिक्का देण्यात येईल. त्यामुळे तुम्हाला तुमची कागदपत्रे परत मिळतील असे सांगण्यात आले. बाजारात ज्या ठिकाणी चोरी झाली तेथे कोणी संशयित दिसतोय का हे पाहण्यासाठी त्यांच्या भावाबरोबर एक पोलिस कर्मचीरी बाजारात फिरला. पण नको तो चौकशीचा ससेमिरा म्हणून त्या तक्रार न देताच परत गेल्या.

मात्र रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या चेकर या कष्टाचे पैसे चोरी गेल्याने रात्रभर बेचैन होत्या. त्यांनी शुक्रवारी सकाळी हा प्रकार जिल्हा परिषद सदस्य मोहीत ढमाले यांना सांगितला. भीतीपोटी तक्रार न दिल्याचेही सांगितले. त्यानतंर ढमाले यांनी त्यांना बरोबर घेऊन पोलीसात पर्स चोरीची तक्रार दिली. त्यानंतर ओतूर पोलिसांनी अज्ञात चोराविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला. याबाबत जिल्हा परिषद सदस्य मोहीत ढमाले म्हणाले ओतूरच्या आठवडे बाजारात वर्दितील किमान चार पोलीसांची गस्त घालण्यासाठी नेमणूक करावी. त्यामुळे पाकीटमारी आणि मेबाईल चोरीली आळा बसेल.

Web Title: Marathi news pune news due to unnecessary inquiry ladies does not register a complaint