कामावर रुजू करून घेण्यासाठी चारशे कामगारांचा ठिय्या

रामदास वाडेकर 
गुरुवार, 11 जानेवारी 2018

टाकवे बुद्रुक (पुणे) : कामावर रुजू करून घेण्यासाठी, कान्हेतील महिंद्रा सीआयई ऑटोमोटिव्ह कंपनीचे चारशे कामगार कंपनीच्या मुख्य गेटवर ठिय्या धरीत आहे, कंपनी व्यवस्थापन आज तरी कामावर रुजू करून घेईल या भाबड्या आशेवर सकाळच्या थंडीत, उपाशीपोटी बसत आहे. कारखान्याचे व्यवस्थापन कानाडोळा करीत या कामगारांकडे वाकडी नजर करीत पुढे जात आहे. आम्हाला या वयात कामावरून काढल्यावर पुढे खायचे काय आणि रहायचे कसे असा प्रश्न आमच्या पुढे आहे. इतके वर्ष रक्ताचे पाणी करून कष्ट केले, त्याचे हेच फळ आम्हाला मिळाले काय अशा तक्रारी कंत्राटी कामगारांनी मांडल्या.

टाकवे बुद्रुक (पुणे) : कामावर रुजू करून घेण्यासाठी, कान्हेतील महिंद्रा सीआयई ऑटोमोटिव्ह कंपनीचे चारशे कामगार कंपनीच्या मुख्य गेटवर ठिय्या धरीत आहे, कंपनी व्यवस्थापन आज तरी कामावर रुजू करून घेईल या भाबड्या आशेवर सकाळच्या थंडीत, उपाशीपोटी बसत आहे. कारखान्याचे व्यवस्थापन कानाडोळा करीत या कामगारांकडे वाकडी नजर करीत पुढे जात आहे. आम्हाला या वयात कामावरून काढल्यावर पुढे खायचे काय आणि रहायचे कसे असा प्रश्न आमच्या पुढे आहे. इतके वर्ष रक्ताचे पाणी करून कष्ट केले, त्याचे हेच फळ आम्हाला मिळाले काय अशा तक्रारी कंत्राटी कामगारांनी मांडल्या. महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीत कंत्राटी पद्धतीवर चारशे कामगार काम करीत होते, दर तीन महिने काम केल्यावर ब्रेक देऊन पुन्हा रूजू करून घेतले जात होते, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीने पुढे मुस्को स्टॅपिंग आणि त्यानंतर महिंद्रा सीआयई असे नावात झालेले बदल या कामगारांनी पाहिले.

पन्नास रूपये रोजंदारीवर काम केलेल्या कामगारांना पुढे टप्प्यात शंभर, दीडशे, दोनशे, अडीशे, तीनशे रूपया पर्यंत रोजचा मोबदला मिळत होता. आता हाच रोजगार बुडाल्याने पुढे करायचे काय, हा प्रश्न त्यांना सतावत आहे. २५ डिसेंबर पासून हे कामगार कंपनीच्या गेटवर येऊन कामाला घ्या असे आवाहन करीत आहे, मात्र यावर व्यवस्थापन आपल्या भूमिकेवर ठाम आहे.कंपनीच्या भूमिकेवर कैलास काकरे, अरूण जाधव, दत्तात्रेय गायकवाड, विजय पवार, दत्तात्रेय मालपोटे, गजानन देशमुख, तुषार सातकर, नितीन सातकर, मंगेश गायकवाड आदि सर्व कामगारांनी नाराजी व्यक्त केली आहे.  कारखान्याचे उत्पन्न घटले आहे, कारखाना तोट्यात आहे अशी कारणे सुडबुद्धीने दिली जात आहे, या कंत्राटी कामगारांच्या जागेवर कंपनी व्यवस्थापनाने अक्षरशः नाक्यावर काम करणाऱ्या कामगारांना आणून काम करून घेतले जात आहे. कामगारांच्या हितासाठी व्यवस्थापनाने सकारात्मक भूमिका घ्यावी अशी मागणी कैलास काकरे, नितीन सातकर, तुषार सातकर आदिंनी कामगारांनी केली आहे. 

 

Web Title: Marathi news pune news employees agitation