एम्प्रेस उद्यान वाचवण्यासाठी पर्यावरण प्रेमी एकवटले

अन्वर मोमीन
रविवार, 25 फेब्रुवारी 2018

एम्प्रेस उद्यानाच्या समितीची पहिली बैठक पर्यावरण प्रेमींच्या उपस्थितीत आज सकाळी झाली.

वडगाव शेरी (पुणे) - एम्प्रेस उद्यानाच्या साडेदहा एकर जागेवर शासकीय निवासस्थान बांधण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी आज एम्प्रेस उद्यान बचाओ समितीची स्थापना करण्यात आली. या समितीची पहिली बैठक पर्यावरण प्रेमींच्या उपस्थितीत आज सकाळी झाली.

बचाओ समितीचे अध्यक्ष म्हणून लेफ्टनंट जनरल (निवृत्त) रमेश कुलकर्णी हे काम करणार आहेत. एम्प्रेस उद्यानाच्या जागेवर शासकीय निवासस्थान उभारण्याचा शासन निर्णय रद्द करण्यास भाग पाडण्यासाठी पर्यावरण प्रेमी संस्था, व्यक्ती, सर्वपक्षीय पदाधिकारी, यांमार्फत दबाव गट तयार करून जन आंदोलन उभारण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती एम्प्रेस उद्यान बचाओ समितीचे सचिव डॉ.श्रीनाथ कवडे यांनी दिली. 

Web Title: marathi news pune news empress garden meeting save environment