वारज्यात महापालिकेच्या हद्दीत वन विभागाचे अतिक्रमण

राजेंद्रकृष्ण कापसे 
शुक्रवार, 19 जानेवारी 2018

पुणे : वारजे माळवाडीच्या हद्दीत पुणे महापालिकेच्या विकास आराखड्यातील रस्त्याचे आरक्षण असलेल्या जागेवर वनविभागाच्या वतीने भिंत बांधण्याचे काम सुरू आहे.

पुणे : वारजे माळवाडीच्या हद्दीत पुणे महापालिकेच्या विकास आराखड्यातील रस्त्याचे आरक्षण असलेल्या जागेवर वनविभागाच्या वतीने भिंत बांधण्याचे काम सुरू आहे.

वन विभाग हे आमच्या सोसायटीने महापालिकेला दिलेल्या जागेतून भिंत बांधणार आहे. पालिकेने आताच काय ती भूमिका घ्यावी. आम्ही यापुढे सोसायटीची एक इंच देखील जागा डीपी रस्त्यासाठी देणार नाही. अशी भूमिका त्रिलोक सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी "सकाळ"शी बोलताना सांगितले.

महापालिकेने, वन विभाग, त्रिलोक व सिद्धीकला सोसायटीची एकत्रित मोजणी करावी आणि वन विभाग व आमची हद्द निश्चित करावी. हे काम वन विभागाच्या हद्दीत सुरू आहे. महापालिकेला रस्त्यासाठी जागा पाहिजे असल्यास त्यांनी रस्ता आमच्या वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून घ्यावा. असे सहायक उपवन संरक्षक महेश भावसार यांनी देखील सांगितले. 

दरम्यान, याच भागातील वन संरक्षण होण्यासाठी संरक्षण भिंत बांधण्यासाठी महापालिकेने निधी दिला आहे. नगरसेवक सचिन दोडके म्हणाले वन विभाग पालिकेच्या हद्दीत भिंत बांधत आहे. महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या निदर्शनास ही बाब आणून देणार आहे. 

 

Web Title: Marathi news pune news encroachment at warje pune municipal corporation