किसानपुत्रांच्या उपोषणाला देशविदेशातूनही प्रतिसाद

कृष्णकांत कोबल
गुरुवार, 8 मार्च 2018

१९ मार्चला होणाऱ्या उपोषणाला महाराष्ट्रात सर्वदूर प्रतिसाद दिसून येत आहे.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात विविध घटकातील नागरिक यामध्ये सहभागी होऊ लागले आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला, पुरुषांसह महाविद्यालयायीन तरुण तरूणी व कुमार वयीन मुलांनीही आपला सहभाग नोंदवला आहे.

मांजरी खुर्द : शेतकऱयांविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी ठिकठिकाणचे किसानपुत्र १९ मार्च रोजी एक दिवस उपोषण करणार आहेत. अन्नदात्यासाठी एक दिवस राज्यव्यापी अन्नत्याग अशी भावना ठेऊन केल्या जाणाऱ्या या आंदोलनाला राज्यासह देशविदेशातूनही पाठिंबा मिळत आहे.

१९ मार्चला होणाऱ्या उपोषणाला महाराष्ट्रात सर्वदूर प्रतिसाद दिसून येत आहे.
महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात विविध घटकातील नागरिक यामध्ये सहभागी होऊ लागले आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिला, पुरुषांसह महाविद्यालयायीन तरुण तरूणी व कुमार वयीन मुलांनीही आपला सहभाग नोंदवला आहे.

हर्ष किशोर वाघ (चिखली, बुलढाणा) हा १२ वर्षांचा मुलगा सहभागी होत आहे. यु एस ए (अमेरिका) येथे रहात असलेल्या व पल्याडवासी या गाजलेल्या चित्रपपटाच्या निर्माती प्रगती कोळगे यांनीही आपण उपवास करणार असल्याचे कळविले आहे. 
जेपी आंदोलनातील नेत्या मणी माला याही दिल्लीत राजवट वर उपोषण करणार आहेत.  मदन जाधव हे अलिगढ विद्यापीठात उपवास करणार आहेत.

१९ मार्च १९८६ रोजी साहेबराव करपे यांच्या संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली होती. अलीकडच्या काळातील ही पहिली शेतकरी आत्महत्या मानली जाते. त्या दिवसापासून आजपर्यत रोज आत्महत्या होत आहेत. या आत्महत्या नसून सरकारी धोरणाने पाडलेले खून आहेत. शेतकऱयांच्या आत्महत्या ही राष्ट्रीय आपत्ती मानून तातडीने उपाययोजना केल्या पाहिजेत असे किसानपुत्र आंदोलनाचे म्हणणे आहे.

शेतकऱयांविषयी सहवेदना व्यक्त करणे, शेतकऱयांविषयीची आपली बांधीलकी बळकट करणे व शेतकऱयांना गुलामीतून मुक्त करण्याचा संकल्प करणे असा या अन्नत्याग आंदोलनाचा हेतू असल्याचे किसानपुत्र आंदोलनाचे अमर हबीब यांनी सांगितले. 

Web Title: Marathi news Pune news farmer agitation