महिलादिनी महिला शिक्षकांना स्वसंरक्षणाचे धडे

संदिप जगदाळे
गुरुवार, 8 मार्च 2018

हडपसर (पुणे) : साधना विद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त महिलांची छेडछाड, विनयभंग, अत्याचार, बलात्कार या घटनांचे वाढते प्रमाण पाहून महिला शिक्षकांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यात आले. अशा वेळी स्वतःच स्वतःच्या संरक्षणासाठी सिद्ध होण्याखेरीज दुसरा पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे साधना विद्यालयातील शिक्षकांना व विद्यार्थीनी महिला दिनानिमित्त स्वसंरक्षणाचे धडे कराटे प्रशिक्षक विजय फरगडे यांनी दिले. हे प्रशिक्षण दर शनिवारी देण्यात येणार आहे. याप्रसंगी प्राचार्य संजय मोहिते, उपप्राचार्य एस. बी. कुलकर्णी, पर्यवेक्षक बी. डी. सुर्यवंशी उपस्थित होते. 

फरगडे म्हणाले, आजकाल बर्‍याच कारणाने महिलांना उशिरा पर्यंत घराबाहेर राहावे लागते. एकटे राहाणार्‍यांनी घरी आणि घराबाहेर काय खबरदारी घ्यावी? एकटे घराबाहेर पडल्यावर, जर कुठल्याही असुरक्षित भागातून जात असू तर अगदी नियमित रित्या घरच्या व्यक्तीला किंवा सहकारी व्यक्तीला फोन करुन आपला खरा ठावठिकाणा कळवत राहणे हा एक उपाय आहे. महिलांनी रात्रीचा प्रवास एकटीने टाळावाच. खुपच अर्जंट असेल तर सोबत कोणाला तरी घ्यावे. सोबत पेपर स्प्रे बाळगणे - तो स्प्रे डोळ्यात गेल्याने अत्याचारी माणूस काही क्षण का होईना थांबतो, हतबल होतो. तेवढ्या वेळात जीव वाचवून पळता येऊ शकते. बिनओळखीच्या पुरुष व स्त्रीयांशी आजिबात बोलू नये. शारिरीक तंदुरूस्तीसाठी पोषक आहार व व्यायाम कराव. कोणी छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर त्याची माहिती तातडीने १०० नंबर ला फोन करून द्यावी. 

प्रशिक्षणार्थी शिक्षिका भारती जाधव म्हणाल्या, स्वसंरक्षणाचे धडे मी व आमच्या सहकारी महिला घेत आहेत. त्यामुळे आमच्यात अत्मविश्वास वाढण्यास मदत होईल. तसेच अडचणीच्या प्रसंगी आम्ही छेडछाड अथवा त्रास देणा-या पुरूषांना विरोध करू. 
 
Web Title: Marathi news pune news female teachers teach self defense