मच्छी मार्केट स्थलांतरास मासळी व्यापाऱ्यांचा विरोध 

प्रशांत चवरे
मंगळवार, 30 जानेवारी 2018

भिगवण : इंदापूर तालुक्यातील मोठी उलाढाल असलेले तक्रारवाडी (ता.इंदापूर) येथील मच्छी मार्केट इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने बांधण्यात आलेल्या नवीन ठिकाणी स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सध्या सुरु आहेत. मच्छी मार्केट स्थलांतरीत करण्याच्या हालचालीमुळे येथील मासळी व्यापाऱ्यांमध्ये असंतोष आहे. याबाबत मासळी व्यापाऱ्यांनी बैठक घेऊन अशा प्रकारचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतल्यास त्यास तीव्र विरोधाची भूमिका घेतली आहे.

उजनी जलाशयातील गोड्या पाण्यातील मासळी व्यवसायाचे तक्रारवाडी (ता.इंदापूर) येथील मच्छी मार्केट सर्वात मोठे केंद्र आहे. तक्रारवाडी (ता.इंदापुर) येथील हे मच्छी मार्केट स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत सुरु असल्याची जोरदार चर्चा या ठिकाणी आहे. या पार्श्वभूमीवर येथील पीरसाहेब मच्छी व्यापारी संघटनेच्या वतीने येथील तारादेवी लॉन्स येथे मच्छी व्यापाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 

बैठकीसाठी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन जराड, उपाध्यक्ष तात्यासाहेब आढाव, सचिव गणेश गजरे,लहु घोलप, माऊली नगरे, संदीप मल्लाव, रामभाऊ वाघ, लक्ष्मण कुंभार, रोहित माडगे, दत्ता लोखंडे, सागर लाळगे आदींसह व्यापारी उपस्थित होते. तक्रारवाडी (ता.इंदापुर) येथील मच्छी मार्केट हे मागील अनेक दिवसांपासून व्यवस्थित सुरु आहे. तक्रारवाडी येथील मार्केटमध्ये व्यापारी व मच्छीमारांना कोणतीही अडचण नाही त्यामुळे येथील मच्छी मार्केट स्थलांतरीत करु नये अशी एकमुखी भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली. 

तक्रारवाडी येथील मच्छी मार्केट स्थलांतरीतर करुन नये, या ठिकाणी सध्या चार लिलाव काटे आहे त्यांची संख्या वाढवू नये, बाहेरील व्यापाऱ्यांना विना परवाना लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यास मज्जाव करावा आदी मागण्या बैठकीमध्ये व्यापाऱ्यांनी केल्या. याबाबत बोलताना पीरसाहेब मच्छी व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन जराड म्हणाले, इंदापुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तक्रारवाडी येथील मच्छी मार्केट स्थलांतरीत करण्याचा हालचाली सुरु असल्याची चर्चा आहे. त्यामुळे येथील मासळी व्यापाऱ्यांमध्ये असंतोष आहे. मासळी व्यापाऱ्यांच्या वतीने इंदापुर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांना सध्याचे मच्छी मार्केट स्थलांतरीत करु नये आदींसह इतरही मागण्या निवेदनाद्वारे करणार आहे.

Web Title: Marathi news pune news fish market shifting oppose