सामान्यातील सामान्य माणसाला केंद्रबिदू मानून काम करा ः गिरिष बापट

sangavi
sangavi

नवी सांगवी : "कोणत्याही कार्यक्रमाचे मोठेपण हे त्याच्या भव्यदिव्य वास्तूच्या देखाव्यातून होत नाही तर सामान्यातील सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्याच्यापर्यंत पोहचणाऱ्या मदतीवर त्या कार्यक्रमाचे यश अवलंबून असते." असे उद्गार पुणे जिल्हियाचे पालकमंत्री गिरिष बापट यांनी येथे काढले. जागतिक युवा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, प्रतिभा महिला प्रतिष्ठान व जिजाई प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने पीडब्ल्युडी मैदानावर आजपासून दोन दिवसांचे मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी आपले विचार मांडले. 

यावेळी व्यासपीठावर महापौर नितिन काळजे, शिबिराचे मुख्य संयोजक आमदार लक्ष्मण जगताप, उपमहापौर शैलजा मोरे, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, सभागृहनेते एकनाथ पवार, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, अॅड. सचिन पटवर्धन, डॉ. अनिल रॉय, पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, यांच्यासह बहुसंख्य नगरसेवक उपस्थित होते. 

शुक्रवार (ता. १२) पर्यंत चालणाऱ्या या महाआरोग्य शिबिरात हृदयरोग, किडनी, हाडांचे व मणक्यांचे आजार, कँन्सर, प्लास्टिक सर्जरी, मेंदू यासारख्या मोठ्या आजारांच्या तपासण्या व शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. आयुर्वेदिक उपचार, गरोदर माता तपासणी, रक्तदाब, स्त्रीरोगाबरोबर राजीव गांधी जीवनदायी योजने अंतर्गत समाविष्ट होणारे सर्व आजार व महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. चष्मे तसेच अपगांना मोफत जयपुर फूट व कँलीपर्सचे मोफत वाटप करणार आहेत. यावेळी कै. पांडुरंग खंडोजी जगताप यांच्या स्मरणार्थ बालाजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष व नगरसेवक हर्षल ढोरे यांनी सुरू केलेल्या रूग्णवाहिकेचे उद्घाटनही नामदार बापट यांच्या हस्ते करण्यात आले. औंध जिल्हा रूग्णालयाचे कँटीन आम्हाला चालविण्यास दिल्यास तेथे कै. पांडुरंग खंडोजी जगताप व चंद्रभागा पांडुरंग जगताप यांच्या स्मरणार्थ रूग्णांच्या नातेवाईकांना रुपये १५ मध्ये पूर्ण जेवण देण्याची आमची तयारी असल्याचे शिबिराचे मुख्य संयोजक आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले. गोपाळ माळेकर व संजय मरकड यांनी संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत काम करून सर्वात जास्त लाभार्थी चिंचवड विधानसभा मतदार संघातून झाल्याचेही सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com