देशात सत्तर लाख नवीन रोजगार :  गिरिराज सिंह

Giriraj Singh
Giriraj Singh

निगडी : केंद्र सरकारच्या धोरणामुळे देशात सत्तर लाख नोकऱ्या निर्माण झाल्याचा दावा केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग राज्यमंत्री गिरिराज सिंह यांनी आज येथे केला. विविध क्षेत्रांत झालेला विकास पाहण्याची दृष्टी विरोधकांकडे नाही. ते जातीपातीच्या राजकारणात अडकले आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. 

पुणे इंजिनिअरिंग क्‍लस्टरने चिंचवड येथे आयोजित केलेल्या पुणे व्हेंडेक्‍स 2018 या चर्चासत्राच्या उद्‌घाटनप्रसंगी सिंह बोलत होते. या वेळी इंजिनिअरिंगसंदर्भात भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन त्यांच्या हस्ते झाले. प्रदर्शनाची पाहणीही त्यांनी केली. 

सिंह म्हणाले, ''सरकारच्या धोरणामुळे रोजगारनिर्मिती व औद्योगिक क्षेत्राला चालना मिळाली आहे. त्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. अधिकाधिक पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला आहे. या क्षेत्रात लक्षणीय प्रगती करत असल्यानेच संपूर्ण जगातील उद्योगक्षेत्राचे लक्ष भारताकडे आहे. यंदाच्या अर्थसंकल्पातही गतवर्षीच्या तुलनेत 59 टक्के अधिक निधीची तरतूद सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयासाठी करण्यात आली आहे.'' इंजिनिअरिंग क्‍लस्टर ट्रेनिंग योजनेत सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी आरक्षण धोरण राबवणे गरजेचे आहे, असे मतही सिंह यांनी व्यक्त केले. 

विरोधकांना विकास दिसत नाही, कारण त्यांना तशी दृष्टी नाही, अशी टीकाही त्यांनी केले. विरोधकांचे जातीपातीचे राजकारण टिकणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. लोकसंख्या ही देशाच्या विकासापुढील मोठी समस्या असल्याचे सांगून, भारतात दर मिनिटाला 29 अपत्ये जन्माला येतात, तर चीनमध्ये 11 हा दाखला त्यांनी दिला. 

या वेळी खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, महापौर नितीन काळजे, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, पुणे इंजिनिअरिंग क्‍लस्टरचे अध्यक्ष सागर शिंदे, उद्योजक संदीप बेलसरे, सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग विभागाचे संचालक राजीव गुप्ते यांच्यासह लघुउद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजीव गुप्ते यांनी प्रास्ताविक केले. अभय दफ्तरदार यांनी सूत्रसंचालन केले. 

गिरिराज सिंह म्हणाले... 

  • इंडस्ट्रिअल क्‍लस्टरसाठी पाच टक्के रिबेट देणार 
  • देशात परकी गुंतवणुकीचा ओघ वाढला 
  • नोटाबंदी, जीएसटीसारखे निर्णय घेण्याची क्षमता फक्त मोदी सरकारमध्ये 
  • विरोधकांचे राजकारण जातीपातीचे 
  • वंदे मातरम, भारत माता की जय हे शब्दही आता राजकीय 

चर्चासत्राचा कार्यक्रम 

  • रविवारी (ता.4) रेल्वे डे अंतर्गत कोकण रेल्वे, मध्य रेल्वे, उत्तर रेल्वे, माझगाव डॉक लिमिटेड या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन. 
  • सोमवारी (ता. 5) डिफेन्स डेअंतर्गत संरक्षण खात्यातील अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com