गोळेगावला ग्रामपंचायत पोटनिवडणुकीत विकास ताम्हाणे व पल्लवी डोके विजयी  

दत्ता म्हसकर
शनिवार, 3 मार्च 2018

जुन्नर (पुणे) : गोळेगाव ता.जुन्नर ग्रामपंचायत पोट निवडणुकीत विकास ताम्हाणे व पल्लवी डोके अनुक्रमे मते 227 व 189 मते मिळवून विजयी झाले. डी.पी.माळी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

निवडणुकीचा खर्च न दिल्याने गोळेगाव ग्रामपंचायतीच्या वॉर्ड क्रमांक तीन व वॉर्ड क्रमांक चार मधील प्रत्येकी  एक जागा रिक्त झाली होती. त्यासाठी झालेल्या पोटनिवडणुकीत  वॉर्ड क्रमांक तीन मधून सावित्रीबाई फुले महिला शेतकरी गटाच्या अध्यक्षा पल्लवी मंगेश डोके तर वार्ड क्रमांक चार मधून बळीराजा कृषी मंडळाचे सदस्य विकास सिताराम ताम्हाणे विजयी झाले.

यावेळी गिरीजा पसंस्थेचे अध्यक्ष राजेश बिडवई , लेण्याद्री देवस्थानचे अध्यक्ष गोविंद मेहेर, सचिव शंकर ताम्हाणे ,विश्वस्त जयवंत डोके , गोळेगाव सोसायटीचे चेअरमन जितेंद्र बिडवई , सदाशिव ताम्हाणे , गणपत मेहेर, आदी मान्यवरांच्या हस्ते विजयी उमेदवारांचा सत्कार करण्यात आला .

Web Title: Marathi news pune news grampanchayat election junnar