वालचंदनगर - कळंबच्या पोटनिवडणूकीमध्ये आशा नलवडे विजयी

राजकुमार थोरात
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

वालचंदनगर : कळंब (ता.इंदापूर) येथील ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणूकीमध्ये  आशा विठ्ठल नलवडे यांचा २५ मतांनी विजय झाला. शासकीय जागेमध्ये अतिक्रमण केल्याच्या कारणावरुन दोन ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरविण्यात आल्यामुळे दोन जागेची निवडणूक झाली.

यामध्ये श्रीकांत विजय वाघमारे यांची प्रभाग - १ मधून बिनविरोध निवड झाली होती. तर प्रभाग ६ मधील एका जागेसाठी  तिरंगी निवडणूक झाली. निवडणूकीमध्ये आशा विठ्ठल नलवडे यांनी बाजी मारुन २५ मतांनी विजय मिळवला. नलवडे यांना ३४६ मते पडली. त्यांनी संगिता शिवाजी जाधव यांचा पराभव केला. जाधव यांना ३२१ मते पडली व कविता कुंडलिक जगताप यांना ६१ मते पडली. आशा नलवडे व श्रीकांत वाघमारे हे  राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पक्षाचे उमेदवार आहेत.

Web Title: Marathi news pune news grampanchayat elections shrikant waghmare