जीएसटीकडे राजकीय भूमिकेतून बघू नका : डॉ. ज. फा. पाटील

कृष्णकांत कोबल
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

मांजरी (पुणे) : "देशाची अर्थव्यवस्था बळकट होण्यासाठी कर व्यवस्था सोपी व सुलभ असावी. ती सोपी करण्यासाठी वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) अमलात आली. जगातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून भारत पुढे येत आहे. राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाल्याने राष्ट्रीय राहणीमानाचा स्तर उंचावला पाहिजे. गोळा झालेल्या कराचा उपयोग समाजकल्याणासाठी व्हावा यासाठी नागरिक, ग्राहकाने जागृत राहिले पाहिजे. जी.एस.टी. परिवर्तनीय असल्यामुळे समाजात मोठा आर्थिक बदल होणार आहे. समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी या कराची दररचना उपयुक्त ठरेल.

मांजरी (पुणे) : "देशाची अर्थव्यवस्था बळकट होण्यासाठी कर व्यवस्था सोपी व सुलभ असावी. ती सोपी करण्यासाठी वस्तू व सेवा कर (जी.एस.टी.) अमलात आली. जगातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून भारत पुढे येत आहे. राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाल्याने राष्ट्रीय राहणीमानाचा स्तर उंचावला पाहिजे. गोळा झालेल्या कराचा उपयोग समाजकल्याणासाठी व्हावा यासाठी नागरिक, ग्राहकाने जागृत राहिले पाहिजे. जी.एस.टी. परिवर्तनीय असल्यामुळे समाजात मोठा आर्थिक बदल होणार आहे. समाजातील विषमता नष्ट करण्यासाठी या कराची दररचना उपयुक्त ठरेल. त्यामुळे जीएसटी हा शहाणपणाचा निर्णय असून त्याकडे राजकीय भूमिकेतून बघू नका'', असे मत जेष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. ज. फा. पाटील यांनी व्यक्त केले.

येथील अण्णासाहेब मगर महाविद्यालयाचा अर्थशास्त्र विभाग व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये "वस्तू व सेवा कर समस्या, संधी व आव्हाने'' या विषयावरवर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषेदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव अॅड. संदिप कदम होते. प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी यांनी प्रास्ताविक केले. उपप्राचार्य डॉ. भाऊसाहेब बेंद्रे, डॉ. आनंद महाजन, डॉ. ए. बी. माने,  डॉ. मेघना भोसले, प्रा. आनंद सारंगे, प्रा. प्रवीण पोतदार, डॉ. अश्विनी घोगरे, डॉ. सुजाता निकम आदी यावेळी उपस्थित होते. 
या परिषदेत डॉ. प्रदीप आपटे डॉ. पी. एस. कांबळे, डॉ. बसवराज कुदाचीमथ, डॉ. श्रीनिवास पाटील, डॉ. विलास कादरोलकर, डॉ. बी. एस. कांबळे आदी अर्थतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. अॅड. कदम म्हणाले, देशाची आर्थिक व व्यापाराची घडी बसविण्यासाठी देश आणि राज्य पातळीवर कर संरचनेत एकसूत्रता आणण्यासाठी वस्तू व सेवा कर अंमलबजावणी केली आहे. देशाच्या पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी आवशक असणारा महसूल उपलब्ध व्हावा यासाठी एक देश एक बाजार एक कर या दृष्टीने ही करप्रणाली महत्वाची आहे. या करप्रणालीतील त्रुटींमुळे ग्राहक, व्यापारी  यांचा संभ्रम निर्माण झाला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैभवी काळे यांनी केले. आभार डॉ. आनंद महाजन यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. ए. बी. माने व डॉ. मेघना भोसले यांनी केले होते.

 

Web Title: Marathi news pune news gst