वालचंदनगरमध्ये जीएसटी विषयी मार्गदर्शन मेळावा

राजकुमार थोरात
मंगळवार, 6 फेब्रुवारी 2018

वालचंदनगर : जीएसटी कर प्रणालीमुळे आमुलाग्र बदल झाला असून पारदर्शकता आली असल्याची माहिती इंदापूर, दौंड, बारामती विभागाचे जीएसटी विभागचे  निरीक्षक अनिल सावंरिया यांनी दिली.

वालचंदनगर : जीएसटी कर प्रणालीमुळे आमुलाग्र बदल झाला असून पारदर्शकता आली असल्याची माहिती इंदापूर, दौंड, बारामती विभागाचे जीएसटी विभागचे  निरीक्षक अनिल सावंरिया यांनी दिली.

वालचंदनगर (ता.इंदापूर) येथे भारत चिल्ड्रेन्स अॅकॅडमी शाळा मधील शिक्षक व  विद्यार्थ्यांना जीएसटी करप्रणालीची माहिती होण्यासाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  शाळेचे प्राचार्य कृष्णदेव क्षीरसागर उपस्थित होते. यावेळी सावंरिया यांनी सांगितले की, जीएसटी कर प्रणालीपूर्वी केंद्र सरकार, राज्यसरकार व स्थानिक प्रशासनाचा वेगवेगळा कर भरावा लागत होता. मात्र जीएसटी करानंतर एकच प्रकारचा कर भरावा लागत आहे. तसेच जीएसटीमुळे करावरती कर लावण्याची पद्धत बंद झाली असून यामुळे अनेक वस्तुंची किमंती कमी होवू लागल्या आहेत. कररुपाने भरलेला पैसा कुठे जात असल्याचे यापुर्वी करदात्याला व नागरिकांन समजण्यामध्ये अडचणी येत होत्या. मात्र  जीएसटी नंतर नागरिकांच्या मनामधील संभ्रमता दूर झाली असल्याचे सावंरिया यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सतिश सराफ व आभार शमशुद्दीन तांबोळी यांनी मानले.  

Web Title: Marathi news pune news gst guidence