पुणे - महिलांना स्वसंरक्षणाचे धडे

संदिप जगदाळे
सोमवार, 12 मार्च 2018

हडपसर (पुणे) : कामगार कल्याण केंद्र हडपसर यांच्या वतीने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. जागतिक महिला दिनानिमित्ताने परिसंवाद व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कतृत्वान कामगार महिलांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला होता. सहाय्यक पोलिस निरिक्षक कल्याणी शिंदे कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण होते. याप्रसंगी सहाय्यक कल्याण आयुक्त श्रीकांत धोत्रे, कामगारर कल्याण अधिकारी विजय शिंगाडे उपस्थित होते. 

यावेळी कल्याणी शिंदे यांनी महिलांना दैनंदिन जिवनात येणाऱ्या अडचणी, समस्या  व त्याबाबत घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन केले.  दिवानी व फौजदारी न्यालयाच्या वकिल राणी कांबळे यांनी महिलांचे मुलभुत हक्क व महिलांचे कायदे आणि स्त्री भ्रृण हत्या आदी विषयावर मार्गदर्शन केले. दामिनी पथकाच्या कर्मचारी गिता दिघे व कल्पना थिटे यांनी महिलांना आपत्तीजनक परिस्थितीत कसा मुकाबला करावा व स्वसंरक्षण कसे करावे या बाबतचे मार्गदर्शन व प्रात्यक्षिके करुन दाखविली. याप्रसंगी कतृत्वान महिलांचा स्मृतीचिन्ह देवून सन्मान करण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिभा येरम, सारा मोरे, श्रीमती दहितुले यांचे सहकार्य लाभले.
 
Web Title: Marathi news pune news guidance of self defense womens day