पुणे - पाणी गळतीमुळे हजारो लिटर पाणी वाया

संदिप जगदाळे
सोमवार, 12 मार्च 2018

हडपसर (पुणे) : कवडे मळा येथे पाण्याची पाइप लाइन लिकेज झाल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. यापूर्वी दोन वेळा काम करूनही सुधारणा झालेली नाही. हा काय प्रकार आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करायला हवी, अशी मागणी सकाळचे वाचक सतिश जाधव यांनी केली आहे. पाणी गळती थांबवून वाया जाणारे पाणी वाचविले पाहिजे. मात्र पाणी तर वाया जातेच, शिवाय जेथे गळती होते, तेथे दलदलही तयार होते आणी पाण्यातून वाहने गेल्यानंतर अनेकदा दुचाकी घसरून अपघात  होत आहेत. 

हडपसर व परिसरात पाण्याची कपात केली आहे. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. हे चित्र असताना देखील लष्कर पाणी पुरवठा विभाग झोपी गेले आहे. एकीकडे पाणीगळती तर दुसरीकडे गटारीचे पाणी रस्त्यावर अशा निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. पाणी पुरवठा करणाऱया पाईपलाईन वेळोवेळी दुरुस्त करून घेतल्या पाहिजेत ही पालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. असे असताना याकडे दुर्लक्ष होत असल्याने पाणी गळतीची समस्या गंभीर बनली आहे. एकीकडे पाणी समस्या तोंड वर काढत असताना पाण्याचा वापर जपून करण्याची गरज असताना दुसरीकडे मात्र पाणी गळतीतून अमूल्य पाणी वाया जात आहे. शिवाजीनगर परिसरात दोन ठिकाणी पाणी गळतीची समस्या निर्माण झाली आहे.

दोन ठिकाणी पाणी गळती झाल्याची ही समस्या गेल्या दोन महिन्यापासून कायम आहे. पाणी रसत्यावरू वाहू लागले आहे. यातून पूर्ण रस्त्यावर दलदल झाली असून नागरिकांना ये-जा करणेही अवघड होत आहे. परिसरातील मुले कोणतेही गांभीर्य लक्षात न घेता या परिसरात बागडत असतात. अशा बालचमूंच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. डासांचा प्रादूर्भाव वाढत असून नागरिकांनी केलेल्या तक्रारींकडे पालिकेने काहीसे लक्ष दिले. पण झालेली ही पाणी गळती काढण्यात कर्मचाऱयांना अपयशच आल्याचे सांगितले जात आहे. परिसरातील नागरिकांचे आरोग्यहित लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने या गळती थांबविण्याचे व निर्माण झालेली दुर्गंधी दूर करण्याची मागणी येथील नागरिकांतून होत आहे.

Web Title: Marathi news pune news hadapsar water leakage water wastage