कोकणे चौक ते काळेवाडी फाटा उच्चक्षमता द्रुतगती मार्गाला मंजुरी

मिलिंद संधान
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

नवी सांगवी (पुणे) : पिंपळे सौदागार -रहाटणी येथील कोकणे चौक ते काळेवाडी फाटा उच्चक्षमता द्रुतगती मार्गाच्या (एचसीएमटीआर) प्रस्तावाला स्थायी समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. या मार्गासाठी स्थायी समितीच्या अध्यक्षा सिमा सावळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत नगरसेविका व स्थायी समिती सदस्या निर्मला कुटे यांनी 28 कोटी 45 लाखांचा निधी मंजूर केल्याचे सांगितले आहे. 

पिंपळे सौदागार-रहाटणी तसेच साई चौकात वाहनांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतुक कोंडी नित्याचीच झाली आहे. या परिसरातील नागरिकांना रस्त्याने चालताना मोठी कसरत करावी लागत आहे. वाढती वाहन संख्या आणि वाहतुक कोंडी यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. लहान मुले, शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक यांना वाहतुकीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 

ही बाब लक्षात घेऊन नगरसेवक शत्रुघ्न काटे, निर्मला कुटे यांनी कोकणे चौक ते काळेवाडी फाटा उच्चक्षमता द्रुतगती मार्ग मार्गी लागण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करुन स्थायी समितीकडे प्रस्ताव सादर केला होता. स्थायीच्या नकत्याच झालेल्या बैठकीत या मार्गाच्या कामासाठी 28 कोटी 45 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. या मार्गाचे काम पूर्ण झाल्यास वाहतूक जलद आणि सुरळीत होऊन कोंडीतून सुटका होणार आहे.

Web Title: Marathi news pune news HCMTR permitted