सिध्देश्वर निंबोडी येथे अंगणवाडीचे उद्घाटन

संतोष आटोळे 
मंगळवार, 16 जानेवारी 2018

शिर्सुफळ : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात याचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी केले.

शिर्सुफळ : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी विविध योजना राबविल्या जातात याचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार यांनी केले.

सिध्देश्वर निंबोडी (ता.बारामती) येथे एकात्मिक बालविकास योजना बारामती प्रकल्प एक अंर्तगत बांधलेल्या अंगणवाडी इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी  पवार बोलत होते. यावेळी बारामती पंचायत समितीचे सभापती संजय भोसले, पंचायत समिती सदस्य लिलाबाई गावडे, विद्यमान सरपंच संजय काकडे, उपसरपंच सुनिल उदावंत, नवनिर्विचित सरपंच मनिषा फडतरे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र सवाणे, अरुणा खंडागळे, माजी सरपंच किशोर फडतरे, धनंजय धुमाळ, आप्पा मोहिते, तुकाराम कुंभार, प्रल्हाद लावंड, आप्पा फडतरे, महादेव लांडगे, महेश नगरे, जालिंदर सवाणे, जनार्दन जाचक यांच्यासह अंगणवाडी पर्यवेक्षिका वृंदा बाप्ते, गावकामगार तलाठी प्रियंका टिळेकर अंगणवाडी सेविका चंपाबाई खडके यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले, आगामी काळातही जिल्हा परिषद तसेच विविध सामाजिक संघटनांच्या माध्यमातून विविध कामे हाती घेण्यात येणार आहेत यासाठी सर्व ग्रामस्थांनी गटातटाचे राजकारण न करता विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपत सवाणे, प्रास्ताविक ग्रामसेविका रंजना आघाव तर आभार पोपट खडके यांनी मानले.

या उद्घाटन कार्यक्रमापूर्वी अंगणवाडीच्या परिसरामध्ये प्रचंड अस्वच्छता पसरली होती. याबाबत सरंपच यांनी अंगणवाडीचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराला दोन दिवसापूर्वीचे परिसर स्वच्छता व उद्घाटन फलक लावण्याची सूचना केली होती. मात्र संबंधित ठेकेदाराने याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केले. यामुळे आज कार्यक्रमापूर्वी सरपंच व गावपुढाऱ्यांची चांगलीच पळापळ पहायला मिळाली. यावेळी उद्घाटन फलकाविना फक्त फित कापून कार्यक्रम उरकुन वेळ मारुन नेण्यात आली.

 

Web Title: Marathi news pune news inauguration of nursery