इंदापूर तालुक्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून १८ कोटींचा निधी

राजकुमार थोरात
शनिवार, 27 जानेवारी 2018

वालचंदनगर : इंदापूर तालुक्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून १८ कोटी ६ लाख २० हजार रुपयांचा भरघोस निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार दत्तात्रेय भरणे यांनी दिली.

इंदापूर तालुक्यातील दळणवळण सोयीस्कर करुन तालुक्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी भरणे प्रयत्नशील आहेत. तालुक्यातील  आठ गावांतील एकूण ३८ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची कामे करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून १८ कोटी ६ लाख २० हजारांचा  रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.

याबाबत भरणे म्हणाले, की तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अंत्यत खराब झाली होती. नागरिकांना प्रवास करताना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने गेल्या तीन वर्षांपासून तालुक्यामध्ये अनेक रस्त्यांची कामे मार्गी लावली आहेत. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या निधीतून तालुक्यातील लासुर्णे ते बोरी हा चार किलोमीटर अंतराच्या रस्तासाठी १ कोटी २२ लाख रुपये, बोरी ते लक्ष्मी मंदिर या साडेपाच किलोमीटर अंतराच्या रस्तासाठी २ कोटी २५ लाख रुपये, निमगाव -कचरवाडी ते तनपुरेवस्ती या चार किलोमीटरच्या रस्त्यााठी १ कोटी ८७ लाख रुपये, पिंपरी ते ओझरे हा साडेचार किलोमीटर रस्तासाठी २ कोटी ५० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. 

निमगाव केतकी ते शेळगाव या पाच किलोमीटर रस्त्याच्या कामासाठी ३ कोटी २६ लाख ८७ हजार रुपये, बावडा ते भोडणी या तीन कि.मी रस्त्याच्या कामासाठी १ कोटी ७४ लाख ३३ हजार रुपये, शेळगाव - कडबनवाडी ते थोरातवाडी रस्त्याच्या आठ किलोमीटर अंतराच्या कामासाठी ३ कोटी ७६ लाख  व बेडशिंगे ते भाटनिमगाव हा चार कि.मी रस्त्याच्या कामासाठी १ कोटी ४५ लाख रुपये मंजूर झाले असल्याचे सांगितले.

Web Title: Marathi News Pune news Indapur CM Gramsadak Yojna 18 crores fund