लासुर्णेमध्ये राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त गोळ्यांचे वाटप

राजकुमार थोरात
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

वालचंदनगर : लासुर्णे (ता. इंदापूर) येथे राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त श्री निलकंठेश्‍वर विद्यालय व ज्युनिअर काॅलेजमध्ये विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्याचे वाटप करण्यात आले.

लासुर्णे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने जंतनाशक दिनानिमित्त इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

पंचायत समिती सदस्य अॅड. हेमंत नरुटे, डॉ. योगेश पाटील, भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे पुणे जिल्हाचे उपाध्यक्ष गजानन वाकसे, विद्यालयाचे मुख्याध्यापक मोमीन, लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्यअधिकारी डाॅ. सुनिल गावडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळ्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी डाॅ. योगेश पाटील यांनी सांगितले की, जंतामुळे बालकांच्या आरोग्यावर गंभीर परीणाम होतात.सतत होणारी पोटदुखी,उलट्यांचा त्रास होणे, मळमळ होणे, भूक कमी लागणे, शौचालयाच्या वेळी रक्त पडत असल्यास पोटामध्ये जंत असण्याची शक्यता असते. जंत होवू नये यासाठी हात स्वच्छ धुणे, भाज्या,फळे धुवून खाणे, उकळलेले पाणी पिणे, पायामध्ये चप्पल, बूट वापरण्याची गरज असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Web Title: marathi news pune news Indapur Lasurne