निकृष्ठ कामाची चौकशी करण्यासाठी तळ्यामध्येच धरणे आंदोलन

Agitation
Agitation

वालचंदनगर : इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये वनविभागाच्या हद्दीमध्ये झालेल्या निकृष्ठ व अपुऱ्या कामाच्या चौकशीसाठी बिरंगुडी (ता.इंदापूर) येथे दोन युवकांनी निकृष्ठ मातीनाला बांधाच्या तळामध्ये एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.  

इंदापूर तालुक्यासाठी जलयुक्त शिवार अभियानातंर्गत जलसंधारणाची काम करण्यासाठी २०१५-१६ साठी साडेदहा कोटी, २०१६-१७ साठी ४ कोटी  व २०१७-१८ साठी बारा कोटी रुपयांचा निधी आला आहे. तीन वर्षामध्ये सुमारे २७ कोटी रुपयामध्ये १२४१ ठिकाणी जलसंधारणाची कामे पूर्ण करणे अपेक्षीत होते.

जलसंधारणाच्या कामापैकी  वनविभागाच्या हद्दीत करण्यात आलेली अनेक कामे अपुरी व निकृष्ठ दर्जाची झाली आहे. २०१७-१८ चे  वर्षे संपत आले तरीही अपुरी कामे पूर्ण झाली नाहीत. तसेच चालू वर्षी तालुक्यामध्ये ६०० मिलीमिटर उच्चांकी पाऊस पडूनही जलासंधारणाची कामे केलेल्या ठिकाणी नोंव्हेबर-डिसेंबर महिन्यातही मातीनाला बंधाऱ्यामध्ये पाणी साचले नव्हते.

निकृष्ठ कामामुळे सर्व पाणी वाया गेल्यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी पाण्यात गेला आहे. बिरंगुडी येथे गेल्या एक वर्षापासुन मातीनाला बंधाऱ्याचे काम सुरु असून अाज अखेर ही हे  काम अपूर्ण अाहे. कामासाठी आणलेली दगडे तळ्यामध्ये टाकलेली आहेत. या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाचे इंदापूर तालुक्याचे उपाध्यक्ष शेखर काटे व दादा भरणे यांनी आज (सोमवार) रोजी एक दिवसाचे धरणे आंदोलन करुन इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील वनविभागाच्या हद्दीतील निकृष्ठ मातीनाल बांध व जलसंधारणाच्या कामाची चौकशी करण्याची मागणी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली असुन चौकशी न केल्यास जंक्शनमधील पोलिस ठाण्यालगत उपोषण करण्याचा इशारा काटे यांनी दिली आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com