पुणे - जुनी सांगवी ग्रामदैवत श्री वेताळ महाराज उत्सवाची तयारी

रमेश मोरे
बुधवार, 7 मार्च 2018

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवीचे ग्रामदैवत श्री वेताळ महाराज उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सचिन ढोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान ग्रामदैवत श्री वेताळ महाराजांचा उत्सव विविध धार्मिक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येतो. तीन दिवस चालणाऱ्या ऊरूसात (जत्रेत) सांगवी व परिसरातील नागरीकांसाठी पर्वणी असते. यावर्षी काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन, भजन, हरिपाठ, हरिकीर्तन, जागर तसेच अखंड हरिनाम सप्ताह, पालखी व काठी मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे.

जुनी सांगवी (पुणे) : जुनी सांगवीचे ग्रामदैवत श्री वेताळ महाराज उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सचिन ढोरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. दरवर्षी गुढीपाडवा ते रामनवमी दरम्यान ग्रामदैवत श्री वेताळ महाराजांचा उत्सव विविध धार्मिक उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात येतो. तीन दिवस चालणाऱ्या ऊरूसात (जत्रेत) सांगवी व परिसरातील नागरीकांसाठी पर्वणी असते. यावर्षी काकडा, ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन, भजन, हरिपाठ, हरिकीर्तन, जागर तसेच अखंड हरिनाम सप्ताह, पालखी व काठी मिरवणूकीचे आयोजन करण्यात आले आहे. १८ मार्च ते २६ मार्च पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम चालणार असल्याचे ग्रामदैवत श्री वेताळ महाराज चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष युवराज ढोरे यांनी सांगीतले.

नुकतीच सर्वांनुमते उत्सव समितीची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सचिन लहुजी ढोरे उपाध्यक्षपदी लालिदास ढोरे राजेंद्र किसनराव ढोरे, किरण पाले सचिव-राजेंद्र शितोळे, सुभाष ढोरे, शिवाजी ढोरे कार्याध्यक्ष म्हणुन जनार्धन पवार, प्रकाश ढोरे, चेतन ढोरे, तर कार्यवाहक म्हणुन खंडूजी किसान ढोरे, अतुल ढोरे, गणेश सुभाष ढोरे, सनी पांडुरंग शितोळे,  सतपाल ढोरे, गणेश ढोरे, यांची निवड करण्यात आली. उत्सव समितीचे सल्लागार म्हणुन अशोकदादा ढोरे-पाटील, विजय बाप्पू ढोरे,सिकंदर अण्णा पोंगडे, युवराजसिंह गायकवाड, राजू कड, चंद्रकांत ढोरे, गोटीराम ढमाले, बबन नथु ढोरे, हे काम पाहतील.

Web Title: Marathi news pune news juni sangavi festival gramdaivat