जमिनीच्या वादातून पुतण्याने केला चुलतीचा खून 

पराग जगताप
शनिवार, 20 जानेवारी 2018

ओतूर (ता. जुन्नर) : जुन्नर तालुक्‍यातील डिंगोरे येथे जमिनीच्या वादातून पुतण्याने चुलतीचा खून केला. ही घटना काल (शुक्रवार) सायंकाळी घडली. 

ओतूर (ता. जुन्नर) : जुन्नर तालुक्‍यातील डिंगोरे येथे जमिनीच्या वादातून पुतण्याने चुलतीचा खून केला. ही घटना काल (शुक्रवार) सायंकाळी घडली. 

या घटनेत मंगल काशिनाथ लोहोटे (वय 55) यांचा मृत्यू झाला. आरोपी पुतण्या रामदास नाथा लोहोटे (वय 30) फरार झाला आहे. याबाबत ओतूर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जमिनीच्या वाटपाच्या वादातून आरोपी रामदास लोहोटो यांनी स्वत:च्या चुलतीला त्या घरी एकट्या असताना डोक्‍यात आणि तोंडावर विटा मारून गंभीर जखमी केले. यानंतर तो फरार झाला. जखमी झालेल्या मंगल यांना नातेवाईकांनी तातडीने उपचारांसाठी प्रथम आळेफाटा येथील रुग्णालयात दाखल केले. नंतर पुण्यातील ससून रुग्णालयात त्यांना नेण्यात आले. येथे उपचारांदरम्यान मंगल यांचा मृत्यू झाला. 

याबाबत प्रशांत काशिनाथ लोहोटे यांनी ओतूर पोलिसांमध्ये फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. फरार असलेल्या रामदासला अटक करण्यासाठी ओतूर पोलिसांचे पथक रवाना झाले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सूरज बनसोडे करत आहेत. 

Web Title: marathi news Pune News Junnar Crime