शाळकरी बालकांवर आग्या मोहळातील माशांनी केला हल्ला

दत्ता म्हसकर
गुरुवार, 8 मार्च 2018

जुन्नर (पुणे) : शाळेतून घरी जाण्यासाठी खासगी वाहनाजवळ थांबलेल्या शाळकरी बालकांवर आग्या मोहळातील माशांनी केलेल्या हल्ल्यात बावीस विद्यार्थी जखमी झाले. यातील आठ जणांना अधिक प्रमाणात दंश झाला असल्याने त्यांना बालरोगतज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

जुन्नर (पुणे) : शाळेतून घरी जाण्यासाठी खासगी वाहनाजवळ थांबलेल्या शाळकरी बालकांवर आग्या मोहळातील माशांनी केलेल्या हल्ल्यात बावीस विद्यार्थी जखमी झाले. यातील आठ जणांना अधिक प्रमाणात दंश झाला असल्याने त्यांना बालरोगतज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

ही घटना आज (ता.8) सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास घडली. येथील शंकरराव बुट्टे पाटील इंग्लिश मीडियम स्कुल मधील इयत्ता पहिली ते चार मधील विद्यार्थी शाळा सुटल्यावर घरी जाण्यासाठी शाळेसमोर असलेल्या नगर पालिकेच्या पाण्याच्या टाकीजवळ खाजगी गाडीची वाट पहात होते. यावेळी अचानक टाकीवरील सुमारे शंभर फूट उंचीवरील आग्या मोहळातील मधमाशांनी खाली येऊन चावा घेण्यास सुरुवात केल्याने एकच गोंधळ उडाला.

प्रामुख्याने डोके, तोंड या भागास दंश झाल्याने दप्तरे टाकून मुले सैरभैर झाली. शाळेतील कर्मचाऱ्यांना ही बाब समजताच त्यांनी येथे धाव घेतली. मुलांना शाळेच्या कार्यालयात नेऊन त्यांच्या अंगावरील माशा काढून मारल्या. मधमाशांनी चावा घेतल्याने अस्वस्थ झालेल्या बालकांना खाजगी तसेच जुन्नरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांनंतर काही बालकांना घरी सोडण्यात आले. मधमाशांनी दंश केल्याने जखमी झालेले विद्यार्थी पुढील प्रमाणे - श्रेया नेहरकर,आर्या नायकोडी शब्दश्री चव्हाण,सार्थक काशीद,गुरुनाथ ढोले,स्वराज ताजने,अवधूत  वर्पे, श्रावणी लोखंडे, कल्पेश  लोखंडे, प्रांजल रोकडे,समर्थ शिंदे,वेदिक मोजाड,सत्यम चव्हाण,कृष्णा चव्हाण, कार्तिकी ढोले,अनुष्का काशीद, अमेय मोढवे,स्वरा पानसरे,ज्ञानेश्वरी डेरे ,ईश्वरी पानसरे.

या बालकांना मधमाशांनी चावा घेतला. येथे असणारे मोहोळ अनेकदा उठल्याने अशा घटना यापूर्वी अनेकदा घडल्या असल्याने नगर पालिकेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे.

Web Title: Marathi news pune news junnar honey bee bites students

टॅग्स