शिवनेरीच्या पायथ्याशी आगीत घर जळून खाक

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 2 मार्च 2018

जुन्नर : किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या कुसुर ता.जुन्नर गावाच्या तलाखी वस्तीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याने लागलेल्या आगीत पांडुरंग बबन मोधे यांचे राहते घर जळून खाक झाले.

यात घरासह गृहउपोयोगी सर्व साहित्य अन्य सामान तसेच कागदपत्रे जळून गेल्याने पाच लाखाचे नुकसान झाले असल्याचे मंडल अधिकारी आर. व्ही. सुपे व तलाठी पी. आर. इंगळे सांगितले.

मोधे यांच्या सुनबाई गीता मनोहर मोधे गुरुवारी घरात स्वयंपाक करीत असताना साडे चार वाजण्याच्या सुमारास गॅस सिलेंडरच्या नळीने पेट घेतला असल्याचे त्यांना दिसले. यामुळे घरात असणाऱ्या आपल्या मुलास घेऊन त्या सिलेंडरचा स्फोट होण्यापूर्वी घराबाहेर पडल्याने बचावल्या. घरातील अन्य पाच सदस्य बाहेर गेले होते. यामुळे जीवितहानी झाली नाही; मात्र घरातील सर्व जळून खाक झाल्याने अंगावरील कपड्यांशिवाय त्याच्याकडे काहीच राहिले नाही.

या भागातील वीज पुरवठादेखील बंद होता यामुळे पाणी टाकून आग विझविण्यास दोन तास लागले. साडेसहा वाजण्याच्या सुमारास आग आटोक्यात आली. ही घटना नेते अतुल बेनके यांना समजताच त्यांनी या कुटूंबियास भेट दिली. यावेळी त्यांनी आर्थिक मदत केली व आवाहन केले उपस्थितांकडून 81 हजाराची मदत जमा झाली.

Web Title: marathi news pune news junnar news Fort Shivneri