जागतिक महिला दिनानिमित्त गोळेगावला आरोग्य मार्गदर्शन शिबीर

दत्ता म्हसकर
शुक्रवार, 9 मार्च 2018

जुन्नर (पुणे) : गोळेगाव ता.जुन्नर येथे डिसेंन्ट फाऊंडेशन आणि सावित्रीबाई फुले महिला शेतकरी गटाच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाच्या निमित्ताने आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यास महिलांचा चांगला प्रतिसाद लाभला.

या शिबिरात डॉक्टर पल्लवी नाले यांनी महिलांना स्रीरोग व मासिक पाळीविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. यशदा बचत गटाच्या अध्यक्षा अनिता व प्रमोद नेवे यांनी उत्पादित केलेल्या रेड डाॅट डिस्पोजेबल बॅगचे अनावरण करण्यात आले. यावेळी एक लाख बॅग मोफत वाटप करण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला. 

यावेळी मनिषा अजित बिडवई व मंदा किरण जगदाळे या गावातील दोन कर्तुत्ववान महिलाना "हॅप्पी वुमन" हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य विकास ताम्हाणे व पल्लवी डोके तसेच जिजाऊ पुरस्कार प्राप्त रेश्मा कोकणे यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित महिलांना डिसेंन्ट फाऊंडेशनच्या वतीने मोफत सॅनिटरी नॅपकिनचे व रेड डाॅट डिस्पोजेबल बॅगचे मोफत  वाटप करण्यात आले. 

कार्यक्रमाच्या  अध्यक्षस्थानी गोळेगावच्या सरपंच शारदा लोखंडे तसेच सदगुरु महिला बचत गटाच्या अध्यक्षा वनीता बिडवई, शारदा गरूड, शारदा माळी, संगिता मेश्राम, उज्वला शेवाळे, किरण खांडगे, वीणा डोके, ज्योती डोके, छाया बिडवई, वृषाली ताम्हाणे, निकीता काळे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन डिसेंन्ट फाऊंडेशनचे प्रकल्प समन्वयक जितेंद्र लोखंडे यांनी केले. प्रास्ताविक जितेंद्र बिडवई यांनी केले. पल्लवी डोके यांनी आभार मानले.

Web Title: Marathi news pune news junnar womens day health