लर्निंग लायसन्ससाठी पुन्हा परीक्षा देण्याची गरज नाही

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

पुणे - लर्निंग लायसन्सची मुदत संपल्यानंतर किंवा लर्निंग लायसन्स हरविल्यानंतर पुन्हा लर्निंग लायसन्स काढायचे असल्यास यापुढे परीक्षा देण्याची गरज नाही. मोटार वाहन कायद्यातील तरतुदीनुसार परिवहन विभागाने पुन्हा परीक्षा घेण्याची अट रद्द केली आहे.

एखाद्या व्यक्तीच्या लर्निंग लायसन्सची मुदत संपली असेल किंवा ते हरविले असेल तर नवीन लर्निंग लायसन्स काढताना परीक्षा देणे बंधनकारक नाही, असे मोटार वाहन कायद्यात नमूद केले आहे. मात्र, परिवहन विभागाच्या अज्ञानामुळे या कायद्याची पायमल्ली केली जात होती. प्रादेशिक परिवहन कार्यालयांमध्ये या प्रकारचे लर्निंग लायसन्स काढण्यासाठी संबंधितांना पुन्हा ऑनलाइन अपॉइंटमेन्ट घेऊन गरज नसतानाही परीक्षा द्यावी लागत होती. याबाबत महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष राजू घाटोळे यांनी पाठपुरावा केला. परिवहन विभाग तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाबरोबर पत्रव्यवहार करून त्यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली. तसेच दुबार लर्निंग लायसन्स काढताना त्यानंतर कायद्याप्रमाणे परीक्षेची अट शिथिल करावी, अशी मागणी केली. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

Web Title: marathi news pune news learning license exam rto