सकारात्मक दृष्टीकोनातून मनुष्याच्या अंगी निर्भयता येते

मिलिंद संधान
गुरुवार, 18 जानेवारी 2018

नवी सांगवी (पुणे) : "स्वतःवरचा विश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोन सांभाळल्यास मनुष्याच्या अंगी निर्भयता जागरूक होते. अशा निर्भय व्यक्तींची देहबोली सुधारत जाताना लोकांशी संपर्क वाढतो. त्यातून ती व्यक्ती एक चांगल्या श्रोत्याच्या भूमिकेत येत असते." असे उद्गार शाहु महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शोभा इंगवले यांनी दापोडी येथे केले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठातंर्गत आजीवन अध्ययन व विस्तार विभाग आणि श्रीमती चंद्रकला किशोरीलाल गोयल कला व वाणिज्य महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या अर्ध दिवसीय कृतीसत्राच्या उद्घाटन प्रसंगी 'ज्ञानविस्तार' या कार्यक्रमातंर्गत व्यक्तिमत्व विकास या विषयावर बोलताना त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी व्यासपिठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विकास पवार, डॉ. स्वाती काळभोर, प्राध्यापक व्हि. एल. देशमुख, डॉ. सोमनाथ दडस, सिध्दार्थ कांबळे, ज्योती लेकुळे उपस्थित होते. 

प्राचार्या इंगवले म्हणाल्या, "एक चांगला वक्ता होण्यासाठी चांगला श्रोता होणे गरजेचे आहे. त्यामुळे नियमित वाचन व श्रवणामुळे प्रयत्न, विनम्रता आणि निर्णय क्षमता विकसित होत जाते. परंतु इंटरनेटच्या अती वापरामुळे कुटुंब, समाजाबरोबर दोन मित्रांमधिलही संवाद हरवत चालला आहे. त्यामुळे चांगल्या समाज व्यवस्थेकरीता संस्कारक्षम विद्यार्थी घडणे महत्वाचे आहे." 

जेष्ठ प्राध्यापिका डॉ. काळभोर म्हणाल्या, "सभोवतालची भौगोलिक व राजकीय परिस्थिती माणसाच्या व्यक्तीमत्वावर परिणाम करित असताना नियमित योग साधना केल्यास निरामय आयुष्य जगता येते. योग साधनेने माणसाचे शरीर, मन आणि बुद्दी यांचा विकास होण्यास मदत होते. त्यामुळे उभे, बसून व झोपून या तिन्हिही प्रकारच्या योगासणांमुळे शारीरिक तंदुरूस्तीबरोबर मानसिक दुर्लबताही कमी होते." प्राध्यापक गणेश मुंजाळ, अमरदिप गुरते यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता परिश्रम घेतले. 

Web Title: Marathi news pune news lecture on personality development