संकष्टीनिमीत्त श्री क्षेत्र लेण्याद्रीला पहाटे पासून भाविकांची गर्दी

दत्ता म्हसकर
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

जुन्नर (पुणे) : अष्टविनायक गणपतींपैकी एक असलेल्या श्री क्षेत्र लेण्याद्री येथील श्री गिरिजात्मज गणपतीचे दर्शन घेण्यासाठी आज शनिवारी (ता. 3) संकष्टी चतुर्थीनिमीत्त भाविकांनी पहाटे पासून मोठी गर्दी केली होती. अशी माहिती देवस्थानचे अध्यक्ष गोविंद यशवंत मेहेर यांनी दिली.

सकाळी देवस्थानचे खजिनदार सदाशिव ताम्हाणे यांच्या उपस्थितीत 'श्री'ना महाअभिषेक करण्यात आला. देवस्थानचे विश्वस्त तसेच कर्मचारी व भाविक उपस्थित होते. दिवसभरात देवस्थानचे अध्यक्ष मेहेर, विश्वस्त काशिनाथ लोखंडे, जयवंत डोके, यांनी भेट दिली. पुणे, नगर, मुंबई, ठाणे, नाशिक तसेच जुन्नर परिसरातून श्री गणेशाच्या दर्शनासाठी भाविक येत होते. मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी विविध सेवा पुरविण्यात आल्या. सायंकाळी मुक्ताई भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम झाला. रात्री चंद्रोदय समयी ९:२८ वाजता गिरिजात्मजकाची महाआरती व नंतर महाप्रसादाचे वाटप होणार आहे.

Web Title: Marathi news pune news lenyadri lord ganesha

टॅग्स