पुणे - जुन्नर येथे चौथा बिबट्या जेरबंद

दत्ता म्हसकर
गुरुवार, 1 मार्च 2018

जुन्नर : हिवरे खुर्द (ता. जुन्नर  येथे आणखी एक बिबट्या वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात आज (ता.१) पहाटे जेरबंद झाला असल्याची माहिती वनरक्षक मनिषा काळे यांनी दिली. वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद होणारा गेल्या दोन महिन्यातील या परिसरातील हा चौथा बिबट्या आहे. हिवरे खुर्द, तेजेवाडी, नेतवड गावांच्या हद्दीत असलेल्या वनक्षेत्रात एक मोठा बिबटया फिरत असल्याची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली होती.

गेले दहा बारा दिवसांपासून  माणिकडोह धरणाच्या डाव्या कालव्याच्या कडेला असलेल्या रवींद्र येधे यांच्या ऊसाच्या शेतात पिंजरा लावला होता. आज पहाटे या पिंजऱ्यात बिबट्या सापडला असल्याचे आढळून आले. ९ ते १० वर्ष वयाचा पूर्ण वाढ झालेला हा नर बिबटया असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. मागील दोन महिन्यांत या परिसरात पकडण्यात आलेला हा चौथा बिबटया असल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणावर बिबटे असल्याचे बोलले जात आहे. या बिबट्याची माणिकडोह ता.जुंन्नर येथील बिबट निवारा केंद्रात रवानगी करण्यात आली. 

Web Title: Marathi news pune news leopard