जुन्नर: ऊसतोड करताना मिळाले बिबट्याचे बछडे

दत्ता म्हसकर
बुधवार, 7 मार्च 2018

या हंगामातील ही तिसरी घटना आहे. येडगाव ता.जुन्नर येथील योगेश भिसे यांच्या शेतात हे बछडे मिळाले. ते दोन महिन्याचे आहेत. वनक्षेत्रपाल सचिन रघतवान यांना वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी हे बछडे ताब्यात घेतले.

जुन्नर : उसतोडीचा हंगाम बिबटयासाठी संवेदनशील ठरत असून मंगळवारी ऊसतोड सुरू असताना सांयकाळी बिबट्याचे दोन बछडे मिळून आले आहेत.

या हंगामातील ही तिसरी घटना आहे. येडगाव ता.जुन्नर येथील योगेश भिसे यांच्या शेतात हे बछडे मिळाले. ते दोन महिन्याचे आहेत. वनक्षेत्रपाल सचिन रघतवान यांना वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी हे बछडे ताब्यात घेतले.

मादी बिबट्याने हे बछडे आपल्या सोबत घेऊन जावेत यासाठी रात्री ते पुन्हा शेतात ठेवण्यात आले होते. परंतु मादी इकडे फिरकली नाही. यामुळे आज रात्री पुन्हा शेतात बछडे ठेवण्यात येणार असून दिवसा माणिकडोह निवारा केंद्रात त्याची काळजी घेण्यात येत बिबट निवारा केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अजय देशमुख यांनी सांगितले.

Web Title: Marathi news Pune news leopard in Junnar