राजयोग-परमात्म्यामुळे जीवनात सुख-शांती मिळेल : राजयोगिनी जानकी दादीजी

समीर तांबोळी
रविवार, 28 जानेवारी 2018

उंड्री : परमात्म्यामुळे रोजच्या जीवनात सुख-शांती मिळेल. मन स्वच्छ ठेवा. राजयोगाने हे सहज शक्य आहे, असे प्रजापिता ब्रम्हकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या राजयोगिनी दादी जानकीजी यांनी काढले. उंड्री-पिसोळी येथील 'जगदंबा भवन' या 'मेडिटेशन अॅन्ड रिट्रीट सेंटर'चे उद्घाटन जानकीजी यांच्या हस्ते झाले.

यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रासह देश-विदेशातून अनुयायी उपस्थित होते. पालकमंत्री गिरीश बापट, आमदार मेधा कुलकर्णी, पं. स. सदस्य सचिन घुले पाटील, जयंती दीदी, संतोष दीदी, सुनिता दीदी, उर्मिला दीदी, भवनाचे अभियंता बालनजी, उंड्री पिसोळी परिसरातील राजकीय सामाजिक कार्यकर्ते, अनुयायी उपस्थित होते. 

गिरीश बापट यांनी आपण अगदी सुरवातीपासून(लहानपनापासून) प्रजापिता ब्रम्हकुमारी केंद्रांना भेट देत असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी भवनाच्या प्रत्येक दालनाला भेट देऊन संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वंदना बहेनजी यांनी केले.

आध्यात्म आधुनिक तंत्रज्ञानाचा सुंदर मिलाफ - 'जगदंबा भवन'

विद्यालयाच्या प्रथम प्रशासिका 'जगदंबा मातेश्वरी' यांनी पुण्यात सर्वप्रथम परमात्म ज्ञानाची सुरवात केली. त्यानंतर दादी जानकी यांनी पुढील १६ वर्षे आपल्या त्याग तपस्या सेवेतून याचा प्रसार केला. 'जगदंबा मातेश्वरी' 'स्मृती प्रित्यर्थ "भवन मेडीटेशन आणि रिट्रीट सेंटर" म्हणजे आजच्या जगदंबा भवनची स्थापना करण्यात आली. एकूण दोन एकर जागेत उभारलेल्या या भवनात ३ हजार लोकांची आसनव्यवस्था आहे.

Web Title: Marathi News Pune News in life will get happiness and peaceful life