विद्यार्थ्यांनी या जाणिवेतून उद्योजकतेची कास धरावी: मदन बाफना

रामदास वाडेकर
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

आंदर मावळातील माळेगाव खुर्द येथील सेवाधाम ट्रस्ट अनुदानित आश्रमशाळेत आयटीआय पूर्व प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या उद्घाटन व शौर्य कंमोडो प्रशिक्षण शिबिराच्या सांगता सोहळयात बाफना बोलत होते.

टाकवे बुद्रुक : आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थी तंत्रज्ञान आणि शौर्य प्रशिक्षणाची सांगड गरूडझेप घेतली, यासाठी या संस्थेने गेली पंचवीस वर्षे मोठी तपश्चर्या केली आहे, कोणत्याही प्रसिद्धीच्या मागे न धावता केलेले हे कार्य निरपेक्ष भावनेतून उभे राहिले आहे, विद्यार्थ्यांनी या जाणिवेतून उद्योजकतेची कास धरावी असे आवाहन राज्याचे माजी महसूल राज्यमंत्री मदन बाफना यांनी केले. 

आंदर मावळातील माळेगाव खुर्द येथील सेवाधाम ट्रस्ट अनुदानित आश्रमशाळेत आयटीआय पूर्व प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या उद्घाटन व शौर्य कंमोडो प्रशिक्षण शिबिराच्या सांगता सोहळयात बाफना बोलत होते. संस्थेचे विश्वस्त कृष्णकांत वाढोकर, काळूराम मालपोटे, शंकर सुपे, राजेश कोकाटे, जालिंदर मेटल, बाळासाहेब खंडागळे, किसन तळपे,भिकाजी धराडी, बाळासाहेब घाडगे, जयदास ठाकर, भाऊ बो-हाडे ,हनुमंत कुकडे आदि उपस्थितीत होते. 

बाफना म्हणाले, "आदिवासी विद्यार्थींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे पवित्र काम, कृष्णकांत वाढोकर व नानासाहेब गोरे यांनी केले, इतक्या दुर्गम भागात शिक्षक देखील प्रमाणिक काम करीत आहे, त्यांचे कौतुक केले पाहिजे, पालकांनी देखील मुलांच्या भविष्यासाठी त्यांना सतत प्रेरणा देणे गरजेचे आहे. 

पाबळ विज्ञान आश्रमच्या 'स्टेप'या संस्थेच्या आर्थिक मदतीने शेती, पशुपालन, अभियांत्रिकी, गृहोद्योगाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, कंमोडो प्रशिक्षण शिबीरात विद्यार्थ्यांना धाडसी व साहसी प्रशिक्षण देण्यात आले. प्रमिला भालके यांनी प्रास्ताविक केले. मनोहर भालके व सुनिल जारकड यांनी सुत्रसंचालन केले. शिवाजी भोर यांनी आभार मानले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi news Pune news Madan Bafna statement