महाखादी मॉडेल देशात राबवावे - गिरिराज सिंह

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

पुणे - 'खादीच्या प्रचार आणि प्रसारासाठी देशात प्रयत्न सुरू आहेत. त्याद्वारे केंद्र सरकार रोजगारनिर्मितीसाठी आग्रही आहे; मात्र खादीला ग्रामोद्योगाची जोड देत महाराष्ट्र सरकारच्या खादी आणि ग्रामोद्योग मंडळाने केलेले काम देशात एकमेवाद्वितीय आहे.

"महाखादी'सारखी विक्री केंद्रे देशभर उभारून "महाखादी मॉडेल' देशात राबवावे'', असे मत केंद्रीय सूक्ष्म व लघुउद्योग राज्यमंत्री गिरिराज सिंह यांनी रविवारी व्यक्त केले.

शिवाजीनगर येथील हातकागद संस्थेच्या आवारात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे राज्यातील पहिली "महाखादी शॉपी' सुरू केली आहे. सिंह यांनी या शॉपीला भेट दिली. या वेळी मंडळाचे सभापती विशाल चोरडिया, खासदार अनिल शिरोळे, "सीबीआरटी'चे उपसंचालक आर. पी. सिंह, "डिक्की'चे अध्यक्ष मिलिंद कांबळे, हातकागद संस्थेचे संचालक रमेश सुरुंग, देवनंद लोंढे, स्नेहल लोंढे व सुनील पांडे उपस्थित होते.

सिंह म्हणाले, 'देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र सरकारने खादी व ग्रामोद्योगाला दिलेले प्रोत्साहन महत्त्वपूर्ण आहे. त्याचा आदर्श इतर राज्यांनीही घेतला पाहिजे. "खादी का तिरंगा'सारख्या उपक्रमातून देशाभिमान आणि ग्रामोद्योगाची सांगड घातली आहे. ग्रामीण कारागीर संग्रहालयासारखे संग्रहालय देशात अन्यत्र नाही. महाराष्ट्रातील काकवीसारख्या पदार्थाचा अभ्यास करून त्याचे ब्रॅंडिंग केले पाहिजे.''

Web Title: marathi news pune news mahakhadi model giririaj singh