पुण्यात मांजाने कापले युवकाचे नाक

दिलीप कुऱ्हाडे
सोमवार, 15 जानेवारी 2018

एखाद्या खेळात निष्काळजीपणा केला तर निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळला जातो.
डेक्कन काॅलेज मैदानात रविवारी मकरसंक्रात निमित्त पंतग खेळताना मांजा रस्त्यावर पडला. दरम्यान संतोष कांबळे (वय 28, रा. कामगारनगर) दुचाकीवरून घरी जात होते.

पुणे : येरवडा डेक्कन कॉलेज रस्त्यावर पंतगाचा मांजा युवकाला लागल्यामुळे त्याचे नाक थोडक्यात बचावले. या अपघातात युवकाच्या नाकाला व गालाला गंभीर दुखापत झाली. सुदैवाने मांजा गळ्याला लागला नसल्यामुळे युवक बचावल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

एखाद्या खेळात निष्काळजीपणा केला तर निष्पाप नागरिकांच्या जीवाशी खेळला जातो.
डेक्कन काॅलेज मैदानात रविवारी मकरसंक्रात निमित्त पंतग खेळताना मांजा रस्त्यावर पडला. दरम्यान संतोष कांबळे (वय 28, रा. कामगारनगर) दुचाकीवरून घरी जात होते.

रस्त्यावर पढलेला मांजा त्यांना दिसला नाही. मांजा चेहऱ्यासमोर आल्याने त्यांच्या नाक व गालावरून घासून गेले. यामध्ये त्यांच्या नाकाला व गालाला गंभीर दुखापत झाली. या दुखापतीत त्यांच्यावर येरवड्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. सुदैवाने मांजा गळ्यावरून न गेल्यामुळे संतोष बचावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या अपघातात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. संतोषवर उपचार केल्यानंतर त्याला रात्री सोडून देण्यात आले.

संतोष एका खासगी कंपनीत नोकरी करीत असून त्याची बेताचीच परिस्थिती आहे. त्यामुळे मित्रमंडळींनी वर्गणी गोळा करून त्याच्यावर उपचार केल्याचे अष्टविनायक मित्र मंडळाचे अध्यक्ष राहुल जाधव यांनी सांगितले.

Web Title: Marathi news Pune news manja youth injured