मराठी राजभाषा दिनानिमित्त नाणेघाटातून साहित्य दिंडी

पराग जगताप
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

ओतूर ता. जुन्नर - मराठी राजभाषा दिनानिमीत्त जुन्नर तालुक्यातील चाळकवाडी नाणेघाट चाळकवाडी अशी साहित्य दिंडी शिवांजली साहित्यपीठ व महाराष्ट्र साहित्या परिषद शाखा चाळकवाडी यांच्या वतीने सोमवारी ता.26 रोजी दुपारनंतर काढण्यात आली. शिवांजली साहित्यपीठ व महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चाळकवाडी यांच्या वतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त चाळकवाडी येथे गेल्या चोबिस वर्षांपासून मराठी राजभाषा दिनानिमित्त शिवांजली साहित्य मोहत्सवाचे आयोजन करण्यात येत. तसेच दहा ते बारा वर्षा पासून नाणेघाट ते चाळकवाडी असे साहित्य दिंडीचे यशस्वी आयोजन केले जात आहे.     

यानिमित्त सोमवारी सायंकाळी पाच वाजता नाणेघाट या ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक मराठी भाषेतील शिलालेखाचे पूजन, प्रसिद्ध गझलकार देविदास इंदापवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी इतिहास अभ्यासक विनायक खोत यांनी नाणेघाटातील दोन हजार वर्षांपूर्वीच्या मराठी भाषेच्या व ब्राम्हणी बाषेच्या शिलालेखाबद्दल माहिती दिली तर पुण्याच्या कवयत्री संगीता झिंजुरके, एकनाथ महाराज रावळ व सुनिल जगताप यांनी यावेळी मराठी भाषेवरील कविता सादर केल्या. तर शिवांजली साहित्यपीठाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी चाळक यांनी शिवांजली साहित्य मोहत्सवाबाबत माहिती दिली. नागपूरचे प्रसिद्ध कवी राजेश कुबडे,सुजित कदम, रमेश खरमाळे, राजेश वैरागडे, पराग जगताप, गणेश मोढवे, पल्लवी बनसोडे, सविता इंगळे, वृषाली शिंदे ,गिता देव्हारे, बाबासाहेब जाधव, कैलास शिंदे यावेळी उपस्थित होते. या साहित्य दिंडीचे जुन्नर शहरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राज्य उपाध्यक्ष अतुल बेनके, तनिष्का प्रतिनीधी उज्वला शेवाळे यांनी या ग्रंथदिंडीचे स्वागत केले होते.
       
Web Title: marathi news pune news marathi bhasha din literature