सेंटर फाॅर परफेक्ट हेल्थ हा राज्यातील अतिविशाल प्रकल्प मावळात

रामदास वाडेकर
गुरुवार, 15 फेब्रुवारी 2018

टाकवे बुद्रुक (पुणे) : सेंटर फाॅर परफेक्ट हेल्थ हा राज्यातील अतिविशाल एकात्मिक प्रकल्प मावळ तालुक्यातील वाहनगाव येथे साकारला जात आहे. सुमारे एक हजार कोटी रूपयांची गुंतवणूक या साठी केली जाणार आहे. महर्षी वेदोव्दारक फाऊंडेशन व महर्षी वेदिक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड या घटक यंत्रणेची यासाठी स्थापना करण्यात आली आहे. राज्य मंत्रीमंडळात या प्रकल्पाला प्रायोगिक तत्त्वावर मान्यता देण्यात आली आहे.

टाकवे बुद्रुक (पुणे) : सेंटर फाॅर परफेक्ट हेल्थ हा राज्यातील अतिविशाल एकात्मिक प्रकल्प मावळ तालुक्यातील वाहनगाव येथे साकारला जात आहे. सुमारे एक हजार कोटी रूपयांची गुंतवणूक या साठी केली जाणार आहे. महर्षी वेदोव्दारक फाऊंडेशन व महर्षी वेदिक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड या घटक यंत्रणेची यासाठी स्थापना करण्यात आली आहे. राज्य मंत्रीमंडळात या प्रकल्पाला प्रायोगिक तत्त्वावर मान्यता देण्यात आली आहे.

उद्योग, पर्यटन, शिक्षण या धोरणानुसार या प्रकल्पाला लाभ देण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. 264 एकर जागेवर पाचशे कोटीची गुंतवणूक करून 5 हजार व्यक्तींसाठी रोजगार निर्मिती केली जाईल. आयुर्वेदिक औषध निर्मिती, ध्यानधारणा, वेलनेस सेंटर, योगध्यान, आयुर्वेदिक महाविद्यालयाची उभारणी केली जाईल.

राज्यात प्रथमच प्रायोगिक तत्वावर पर्यटन, उद्योग क्षेत्र रोजगार, परिसर विकास यांचा मेळ साधणाऱ्या या नाविन्यपूर्ण उपक्रमास शासनाने प्रोत्साहन दिले आहे. पर्यटन धोरण व उद्योग धोरण या धोरणाचा निकष पूर्ण करीत हा प्रकल्प साकारला जात आहे.. आयुर्वेदिक औषधे निर्मिती, अॅरोमा व औषधीय तेल निर्मिती, सेंद्रीय शेती मधून निर्माण होणाऱ्या शेतमालावर प्रकिया,शीतगृह निर्मिती यासाठी 200 कोटीची गुंतवणूक करण्यात येणार आहे.

वाहनगावची निसर्ग संपन्नता 
वाहनगाव निसर्ग विपुलतेने नटलेले गाव, ठोकळवाडी धरणाच्या पश्चिमेला आहे, गावच्या परिसरात सन 1958 च्या सुमारास जाणीवपूर्वक  निलगिरी, अशोक, सुरू, सुबाभूळ अशी विविध प्रकारची  सुमारे पन्नास हजार रोपांची लागवड केली होती. गावकुसाच्या परिसरात देशी आंबा, जांभुळ, बेहडा, हिरडा, अंजन, कांचन, करवंदीच्या जाळी अशा देशी रोपांची शेकडो झाडे वर्षानुवर्षे स्वच्छ ऑक्सीजन पुरवित आहे. नियोजित प्रकल्पाच्या तिन्ही बाजूला धरणाचे बॅग वाॅटर आहे. स्वच्छ  सूर्यप्रकाश, पोषक हवामानाचे वैभव लाभले आहे. नाचणी, सावा, वरई या सारख्या पोषक धान्य निर्मितीची ही जनक भूमी आहे. सुमारे 70 घरांच्या गावाची लोकसंख्या सन 2011 च्या जनगणनेनुसार 346 आहे.

आमदार बाळा भेगडे म्हणाले, "संपूर्ण मावळ तालुक्याला निसर्ग साधनेची विपूलता लाभली आहे, तालुक्यातील हा महत्वाकांक्षी प्रकल्प राज्यात माॅडेल प्रकल्प ठरेल, या प्रकल्पाने विकासाचा टप्पा अधिक वाढेल असा विश्वास आहे. या रिसर्च सेंटर मधील आयुर्वेदिक शिक्षण आरोग्याची आवाहने पेलताना पुढच्या पिढीला उपयुक्त ठरेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील निरोगी सशक्त भारतासाठी योगध्यान केंद्र येथे साकारणार आहे. कालच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मावळच्या जनतेच्या वतीने आभार मानले. कॅबिनेटने या प्रकल्पास मान्यता दिली असून राज्य सरकारच्या दिलेल्या गाईडलाईन नुसार प्रकल्प साकारला जाईल. 

मावळला उद्याच्या काळात सोन्याचे दिवस आहे, शेतकऱ्यांनी जमिनी विकू नये. वाहनगावात सेंटर फाॅर परफेक्ट हेल्थ या महत्वाकांक्षी प्रकल्पाने अधिक गुंतवणूकदार या परिसरात आकर्षित होतील. या प्रकल्पामुळे मोठया रोजगाराची निर्मिती होऊन शेतीपूरक व्यवसाय वाढतील.  

Web Title: Marathi news pune news mawal center for perfect health project