विश्‍वजीत नलवडे याची राष्ट्रीय भालाफेक स्पर्धेसाठी निवड

राजकुमार थोरात
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

वालचंदनगर (पुणे) : वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील  विश्वजीत नानासाहेब नलवडे या विद्यार्थ्याने 19 वर्षाखालाली गटामध्ये  राज्यस्तरीय भालाफेक स्पर्धेमध्ये  प्रथम क्रंमाकाचे बक्षीस पटकावले असून त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

धुळे जिल्हातील मालपुर मध्ये नुकत्याच राज्यस्तरीय भालाफेक  स्पर्धा पार पडल्या. स्पर्धेमध्ये नलवडे याने 19 वर्षांखालील मुलांच्या गटात क्रमांक पटकावला असून त्याची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली. जम्मू-काश्‍मीरमध्ये राष्ट्रीय स्पर्धा होणार आहेत. नलवडे याच्या यशाबद्दल शाळा समितीचे अध्यक्ष अमोल बर्गे, प्राचार्य एन.एन.जाधव , क्रीडाशिक्षक सुरेश तिवाटने, माणिक पिसे व हिरालाल शेंडे यांनी अभिनंदन केले.
 
Web Title: Marathi news pune news national level selection