भरणेवाडीमध्ये जिल्हातील अद्यावत ग्रामसचिवालयाच्या इमारतीचे काम पूर्ण

राजकुमार थोरात
शनिवार, 30 डिसेंबर 2017

वालचंदनगर : भरणेवाडी (ता.इंदापूर) येथे जिल्हा परिषद व राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुमारे सव्वातीन कोटी रुपये खर्चुन जिल्ह्यातील सर्वात मोठी व अद्यावत ग्रामसचिवालयाच्या सुसज्ज इमारतीचे काम पूर्ण झाले असून इमारतीमुळे अंथुर्णे व भरणेवाडी गावच्या वैभवामध्ये भर पडली आहे. भरणेवाडी येथे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या प्रयत्नातुन ग्राम-सचिवालयाची एक हजार स्क्वेअर मीटर क्षेत्रफळाच्या तीन मजली इमारती  उभारली आहे.

वालचंदनगर : भरणेवाडी (ता.इंदापूर) येथे जिल्हा परिषद व राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून सुमारे सव्वातीन कोटी रुपये खर्चुन जिल्ह्यातील सर्वात मोठी व अद्यावत ग्रामसचिवालयाच्या सुसज्ज इमारतीचे काम पूर्ण झाले असून इमारतीमुळे अंथुर्णे व भरणेवाडी गावच्या वैभवामध्ये भर पडली आहे. भरणेवाडी येथे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या प्रयत्नातुन ग्राम-सचिवालयाची एक हजार स्क्वेअर मीटर क्षेत्रफळाच्या तीन मजली इमारती  उभारली आहे. या ग्रामसचिवलयाच्या इमारतीमध्ये सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व तंटामुक्त अध्यक्षांकरिता वेगवेगळी कार्यालये बनवण्यात आली असून कार्यालयीन कामकाजाकरिता स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या महिला व पुरुष सदस्यांकरिता वेगवेगळा बैठक कक्ष उभारण्यात आला आहे. ग्रामसचिवालयामध्ये कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी प्रतिक्षाकक्ष बनवण्यात आला असून बाहेरगावाहून येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी विश्रामगृहाची सोय करण्यात आली आहे. गावातील  युवकांना व्यायाम करता येण्यासाठी सुसज्ज व्यायामशाळा उभारण्यात आली असून यामध्ये लवकरच अत्याधुनिक जिमचे साहित्य बसविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील युवकांना लोकसेवा आयोग तसेच विविध स्पर्धा परीक्षेचा आभ्यास करता येण्यासाठी भव्य ग्रंथालय, अत्याधुनिक अभ्यासिका व संगणक कक्ष उभारण्यात आले असून येत्या महिनाभरात या इमारतीचा उद्घाटन सोहळा पार पडणार असल्याचे आमदार भरणे यांनी सांगितले.

 

Web Title: Marathi news pune news new building of grampanchayat