patangrao-kadam
patangrao-kadam

डॉ. पतंगराव कदम म्हणजे बेधडक, गतिशील नेता 

हडपसर - अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत पुढे जाण्याचा ध्यास घेतलेले, हितचिंतकांसह विरोधकांनाही मदत करणारे आणि तळागाळातील सर्वसामान्य माणसाला मदत करणारे म्हणून माजी मंत्री व आमदार डॉ. पतंगराव कदम यांची ओळख होती. त्यांच्या आकस्मिक निधनाने राज्यातील शिक्षण, राजकारण, सहकार क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा शब्दात माजी आमदार व रयत शिक्षण संस्थेच्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष अॅड. राम कांडगे यांनी पंतगराव कदम यांना श्रद्धांजली वाहिली. एस. एम. जोशी कॉलेजमध्ये रयत शिक्षण संस्था, पश्चिम विभाग येथे डॉ. पतंगराव कदम यांच्या शोकसभेत अॅड. कांडगे बोलत होते. 

याप्रसंगी विश्वजित कदम, माजी आमदार मोहन जोशी, जगन्नाथ शेवाळे, विरोधी पक्ष नेते चेतन तुपे, दिलीप तुपे, प्रवीण तुपे, विजयराव कोलते, जखिरभाई पठाण, प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले, प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, प्राचार्य डॉ. पांडुरंग गायकवाड, प्राचार्य डॉ. शर्मिला चौधरी, दशरथ जाधव, प्राचार्य डॉ. के. डी. जाधव, शशिकला जाधव, प्राचार्य डॉ. नानासाहेब गायकवाड, अशोक जगदाळे, शं. मा. डिंगणे, बाळासाहेब शेख, डॉ. प्रमोद बोत्रे आदिमान्यवर उपस्थित होते.

मोहन जोशी म्हणाले की, सर्वसामान्यांच्या कामासाठी पुढाकार घेणारे, पुणे शहरातील पानशेत धरणग्रस्तांसाठीच्या भाडेतत्वारील वसाहती कायमस्वरूपी करून देणारे, सर्वसामान्यांना घरे मिळवून देण्यासाठी डॅा. कदम यांनी प्रयत्न केले.  

जगन्नाथ शेवाळे म्हणाले की, जिंदादिल, हजर जबाबी, बेधडक, रांगडेपणा असणारे व कर्तृत्वाचा डोंगर निर्माण करणारे असे उतुंग व्यक्तिमत्त्व पतंगराव कदमसाहेब होते. 

चेतन तुपे म्हणाले की, स्वतःला जनकार्यासाठी वाहून घेणारे व माणसावर मायेची जादू करणारे व हडपसरचे भाग्यविधाते म्हणजे कदम साहेब होते. त्यांनी आपल्या शिक्षकी पेशाची सुरवात हडपसरमधून केली. त्यामुळे हडपसरवर व साधना संकुलावर त्यांचे जीवापाड प्रेम होते.

प्राचार्य डॉ. अरविंद बुरुंगले म्हणाले कि, कर्मवीरांच्या विचारांची प्रेरणा घेऊन आयुष्यभर रयत व भारती विद्यापीठाच्या माध्यमातून सर्वसामांन्यांना शिक्षण देण्याचे कार्य कदम साहेबांनी केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com