शास्तीकर वगळून मिळकतकर घ्यावा: हर्षल ढोरे

रमेश मोरे
शनिवार, 20 जानेवारी 2018

महापालिकेच्या वतीने सध्या थकीत शास्तीकरासह मिळकतकर जमा करून घेतला जात आहे. त्यातच पंधरा दिवसात शास्तीकरासह मुळमिळकतकर भरावा अशा नोटीसा नागरीकांना दिल्याने नागरीक वैतागले आहेत. यामुळे नागरीकांची आर्थिक कुचंबणा होत आहे. महापालिकेच्या करसंकलन कार्यालयाच्या वतीने शास्तीकर वगळुन मिळकतकर स्विकारला जात नसल्याने थकबाकी वाढुन मोठी रक्कम होत आहे. यामुळे नागरिक धास्तावले आहेत.

जुनी सांगवी : पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकाम केलेल्या मिळकतधारकांकडून शास्तीकर वगळून मिळकतकर घ्यावा. पालिकेने नागरीकांना दिलेल्या नोटीस निर्णय शासन दरबारी शास्तीकराचा निर्णय होईपर्यंत माघारी घेवुन शास्तीकर वगळून मूळ मिळकतकर भरून घ्यावा असे निवेदन भाजपा नगरसेवक हर्षल ढोरे यांनी पिंपरी चिंचवड पालिका आयुक्तांना दिले.

महापालिकेच्या वतीने सध्या थकीत शास्तीकरासह मिळकतकर जमा करून घेतला जात आहे. त्यातच पंधरा दिवसात शास्तीकरासह मुळमिळकतकर भरावा अशा नोटीसा नागरीकांना दिल्याने नागरीक वैतागले आहेत. यामुळे नागरीकांची आर्थिक कुचंबणा होत आहे. महापालिकेच्या करसंकलन कार्यालयाच्या वतीने शास्तीकर वगळुन मिळकतकर स्विकारला जात नसल्याने थकबाकी वाढुन मोठी रक्कम होत आहे. यामुळे नागरिक धास्तावले आहेत. सांगवी परिसरात जवळपास तीस ते चाळीस टक्के रहिवासी शास्तीकर भरतात. शासन दरबारी निर्णय होईपर्यंत शास्तीकर वगळुन मुळ मिळकतकर भरून घेतल्यास महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होईल.

मूळ मिळकतकर भरायला नागरिक तयार आहेत. मात्र दोन्ही कराची रक्कम मोठी होत असल्याने नागरीक आर्थिक कोंडीत सापडला आहे, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी सांगवी भाजपाचे नगरसेवक संतोष कांबळे, नगरसेविका माई ढोरे, नगरसेविका शारदा सोनवणे, हर्षल ढोरे यांच्या वतीने शास्तीकर वगळुन मूळ मिळकतकर नागरीकांकडुन भरून घ्यावा याबाबत पालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले.

Web Title: Marathi news pune news pimpri chinchwad municipal corporation tax