पुणे - पिंपरीतील विद्यार्थ्याच्या खूनाप्रकरणी एकास अटक

संदीप घिसे 
मंगळवार, 13 मार्च 2018

पिंपरी (पुणे) : एका पंधरा वर्षीय विद्यार्थ्याचा गळा चिरून खून करण्यात आला. ही घटना निगडीतील पूर्णानगर भागात सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी एकास निगडी पोलिसांनी अटक केली.

पिंपरी (पुणे) : एका पंधरा वर्षीय विद्यार्थ्याचा गळा चिरून खून करण्यात आला. ही घटना निगडीतील पूर्णानगर भागात सोमवारी रात्री घडली. या प्रकरणी एकास निगडी पोलिसांनी अटक केली.

वेदांत जयवंत भोसले (वय १५ रा. पूर्णानगर) असे खून झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. रोहित प्रदीप मागीकर (वय १८, रा.पूर्णानगर, निगडी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. सोमवारी रात्री पावणे बारा वाजताच्या सुमारास एकजण जखमी अवस्थेत पूर्णानगर येथे पडला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांना वेदांत जखमी अवस्थेत दिसून आला. त्यास रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.

वेदांत हा निगडीतील माता अमृता शाळेत दहावीमध्ये शिकत होता. मैत्रिणीसोबत अभ्यास केल्यानंतर रात्री तो तिला सोडवण्यासाठी गेला होता. तिला सोडून तो परत घरी येत असताना हा हल्ला झाला.

वेदांत ज्या मुलीसोबत अभ्यास करायचा त्या मुलीवर संशयित आरोपी रोहन हा प्रेम करायचा. वेदांत अभ्यासाच्या माध्यमातून त्या मुलीच्या जवळ येत असल्याचा समज रोहनचा झाला होता. याच कारणावरून वेदांत याचा खून झाला असल्याचे तपासात समोर आले आहे.

Web Title: Marathi news pune news pimpri student murder accused arrested