शौचालय बांधण्याची व आत्महत्या न करण्याची जनजागृती

राजकुमार थोरात
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

वालचंदनगर (पुणे) : गावातील सर्वसामान्य कुटूंबामधील सरपंच झालेल्या मुलीचा गावातीलच धनदांडग्या पाटील कुंटूबातील मुलाशी विवाह ठरतो...मात्र ऐन वेळी मुलगी पाटलांच्‍या घरामध्ये शौचालय आहे का? याची विचारणा करते...पाटील शौचालय नसल्याचे सांगताच मुलगी विवाह करण्यास नकार देते...गावातील नागरिक मुलीला शौचालय नसले म्हणून काय झाले, श्रीमंत घराणे असून लग्नास तयार होण्याची विनवणी करतात. मात्र मुलगी ज्याच्या घरी शौचालय आहे त्याच्याशी  लग्न करण्याचा निर्णय घेते...

कळंब (ता. इंदापूर) येथील व्यंकटेश्‍वरा इंग्लिश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थ्यांनी ‘लाख मोलाचा सवाल’ या नाटिकेमधून ‘शौचालय बांधा घरोघरीचा’ संदेश देऊन हगणदारीमुक्त गाव करण्याची जनजागृती केली. 

येथील शाळेच्या माध्यमातुन विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. नुकत्याच झालेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी विविध सामजिक विषयावर प्रकाश टाकला. राज्यामध्ये अनेक शेतकरी आत्महत्या करीत आहेत. कुंटूब प्रमुख आत्महत्या केल्यानंतर त्याचे कुंटूब उघड्यावर येते. कुटूंबातील सदस्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. सुरळीत चालणाऱ्या संसाराची गाडी अचानक बिघडते. आत्महत्या करणारा माणूस जगात नसून मात्र कुंटूबातील सदस्यांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने कुंटूबाप्रमुखाने आत्महत्या न करण्याचा संदेश दिला. दोन्ही नाटिकांचे नियोजन संजय पाटोळे, सचिन बंडगर, अमोल कोकरे, कलावंत भिसे यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष उत्तम फडतरे, सचिव दत्तात्रेय फडतरे, शाळेचे प्राचार्य संदीप पानसरे यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले.

Web Title: Marathi news pune news play toilets suicide awareness