ज्येष्ठ नागरिकांना उद्यापासून 500 रुपयांतच मासिक पास

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

पुणे : शहर आणि पिंपरी- चिंचवडमधील ज्येष्ठ नागरिकांना पीएमपीचा मासिक पास येत्या सोमवारपासून (ता. 12) सवलतीच्या दरात उपलब्ध होणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे. 

ज्येष्ठ नागरिकांना या पूर्वी पीएमपीचा मासिक पास 450 रुपयांना उपलब्ध होता. परंतु मधल्या काळात पीएमपी प्रशासनाने पासचे अनुदान कमी केल्यामुळे या पासची किंमत 750 रुपये झाली होती. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक संघटनांनी त्याला विरोध केला होता. या बाबत काही स्वयंसेवी संस्थांनीही दरवाढ कमी करण्याची मागणी केली होती.

या पार्श्‍वभूमीवर पीएमपीच्या संचालक मंडळाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत ज्येष्ठ नागरिकांसाठी मासिक पासचा दर 700 ऐवजी 500 रुपये करण्याचा निर्णय झाला. या निर्णयाची अंमलबजावणी येत्या सोमवारपासून होणार असल्याचे प्रशासनाने कळविले आहे.

तसेच विशिष्ट मार्गांवर विद्यार्थ्यांसाठी सवलतीच्या दरातील पंचिंग पासही सोमवारपासून मिळणार आहेत. या बदलाची नोंद घेऊन प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन पीएमपीने केले आहे.

Web Title: marathi news pune news PMPML Pass